उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर;राजापूर , रत्नागिरी आणि चिपळूण येथे सभा.

Spread the love

डिजिटल दबाव वृत्त

रत्नागिरी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सोमवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत . या दौऱ्यात ते राजापूर , रत्नागिरी आणि चिपळूण येथे जनसंवाद सभा घेणार आहेत .
या सभांमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस , राष्ट्रवादी व अन्य मित्रपक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी होणार आहेत . व ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत . या दौऱ्यात राजापूर येथे जवाहर चौक येथे आज सकाळी ११ वाजता जनसंवाद सभा घेणार आहेत . त्यानंतर धूतपापेश्वर मंदिराची पाहणी करणार आहेत . रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे दुपारी १:४५ वाजता सभा होणार आहे . त्यानंतर चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी ५ वाजता जनसंवाद सभा घेणार आहेत .
उद्धव ठाकरेंच्या या सभेच्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस तसेच वंचित आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत . दोनच दिवसांपूर्वी या संदर्भात चिपळूणमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती . त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या दौरा तसेच सभेबाबत चर्चा करण्यात आली होती . त्यावेळी महाविकास आघाडी एकत्रपणे काम करेल असे स्पष्ट करण्यात आले होते .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page