
दापोली/ प्रतिनिधी- दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 43 व्या पदवीदान समारंभास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री.सी.पी.राधाकृष्णनजी यांच्यासमवेत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पदवीबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कृषी विभागातील शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना व देशाला झाला पाहिजे असे आवाहन ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केले.

कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण घेतलेली पदवी देशाच्या कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देणारी ठरावी व आपल्याकडून शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन व्हावे आणि त्यामधून देशाच्या कृषी व्यवस्थेत सकारात्मक बदल घडावते अशी अपेक्षा यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री माणिकरावजी कोकाटे, राज्यमंत्री योगेशजी कदम, विद्यापीठाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.