
संगमेश्वर :- तालुक्यातील कुरधुंडा येथे डंपरने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक दिली. गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकिब इबजी (रा. मजगाव, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले. यावेळी संतप्त जमावाने डंपर चालकाला चोप दिला. मुंबई – गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे
काम सुरू आहे. गुरुवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीस्वार (एमएच ०८ एई ६९४१ ) रत्नागिरीच्या दिशेने येत होता. यावेळी संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या या डंपरने दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेला जाऊन जोरदार ठोकर दिली. समोरून दुचाकीला धडक दिल्याने डंपरचे चाक दुचाकीस्वाराच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

यापूर्वीही मुंबई गोवा हायवरती जे म्हात्रे कंपनीच्या डंपरमुळे दोन युवकांचे जीव घेतले आहेत.लोकांमधून सदोष मनुष्यवधचा गुन्हा कंपनीवर दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत. परंतु राष्ट्रीय महामार्ग विभाग पोलीस डिपार्टमेंट व आरटीओ विभाग कोणती कारवाई करताना दिसून येत नाही. कॉन्ट्रॅक्टर व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये संगणमत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. लवकरच पत्रकार व ग्रामस्थ आंदोलन उभारणार आहेत.