अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे इंजिनपासून निखळले…

Spread the love

*सुरत-* गुजरातमधील सुरतजवळ आज अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे दोन डबे वेगळे झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने (डब्ल्यूआर) जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली. जेव्हा ट्रेन (क्रमांक १२९३२) सायन आणि सुरत रेल्वे स्थानकांदरम्यान गोथंगम यार्डमध्ये पोहोचली होती. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीत. वेगळे झालेले डबे नंतर पुन्हा ट्रेनमध्ये जोडले गेले.

पश्चिम रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितले की, घटनेनंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर लूप लाइनवरून अप गाड्या चालवण्यात आल्या. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, या मार्गावरील इतर गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. पश्चिम रेल्वेने नंतर जाहीर केले की दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या घटनेनंतर तातडीने रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेचे आधिकारी तसेच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर ही ट्रेन दुरुस्त करण्यात आली. मात्र, दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ शेकडो प्रवाशांचे हाल झाले. अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या या डबल डेकर एक्सप्रेसचं कपलिंग तुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, कपलिंग तुटल्यानंतर पुन्हा वेगळे झालेले डब्बे जोडण्यात आले. यानंतर एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page