संगमेश्वर, १० ऑगस्ट- संगमेश्वर येथील संगम ज्येष्ठ नागरिक संघाचा वृक्षारोपण कार्यक्रम अलीकडेच पार पडला.जी. प.मराठी शाळा, आंगणवाडी,पैसा फंड हायस्कूल, जाखमातादेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये,उपाध्यक्ष शशिकांत खातू,कार्यवाह उदय संसारे,दादा कोळवणकर,साळवी भाऊ,विनायक पाथरे,जनार्दन शिरगावकर,बाबा शिंदे,दिनेश आंब्रे इत्यादी मान्यवर तसेच मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा भिडे, प्राची चोचे,रेखा जाधव, आंगण वाडी शिक्षिका सौ.पल्लवी शेरे, सौ.शीतल आंब्रे तसेच पैसा फंड संस्थेचे कार्यवाह धनंजय शेट्ये,पर्यवेक्षक मोरगे सर,पराडकर सर व त्यांचे सहकारी तसेच जाखमाता मंदिर संस्थेचे बाळा शेट्ये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.विविध प्रकारची फुलझाडे तसेच शोभेची झाडे लावण्यात आली.
नंतर पैसा फंड हायस्कूलमधील पुरस्कारप्राप्त कला दालनाला ज्येष्ठ नागरिक संघ सदस्यांनी भेट देऊन कला दालनाचे व कला शिक्षक पराडकर सर यांचे त्यांच्या स्तुत्य कामगिरीबद्दल कौतुक केले.तसेच पैसा फंड हायस्कूलला शैक्षणिक प्रगतीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे कार्यवाह धनंजय शेट्ये व पर्यवेक्षक मोरगे सर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला सन्मानचिन्ह भेट देऊन संघाचे आभार मानले.