
▪️काहीतरी आव्हानात्मक करायचे या जिद्दीने वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्न उराशी बाळगून केरळच्या सुपूत्राने कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला आहे
विशेष म्हणजे हि सायकल तो एका चाकावर चालवत असून आतापर्यंत त्यानें ३ हजार किलोमीटर चे अंतर पूर्ण केले असून . अजून लांबीचा पल्ला बाकी आहे .प्रवासादरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले .
▪️मुळचा केरळ राज्यातील कन्नूर येथील असलेला सनीद डीबीझेड हा अवघा २३ वर्षांचा तरुण आहे मुळातच त्याला सायकलींगची आवड असून ९ते १० वर्षांपासून हे करत असल्याने केरळ राज्यात त्याची तशी ओळख आहे.या छंदातून काहीतरी किमया करावी यासाठी वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्न बघितलेल्या सनीदने कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकलने प्रवास करायचा असे ठरवले
▪️विशेष म्हणजे हि सायकल दोन चाकावर न चालवता मागच्या एकाच चाकावर चालवत हा प्रवास पूर्ण करायचा.
▪️१५ डिसेंबर २०२३ ला त्यानें कन्याकुमारीतून प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात केली .
तो चालवत असलेल्या सायकलचे पुढचे चाक काढलेले असुन मागील चाकावर हा त्याचा प्रवास सुरू आहे.
▪️प्रत्येक दिवशी ५० ते ६० किमीचे अंतर पूर्ण करत असून सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सायकल चालवायला सुरुवात केल्यावर अंधार होईपर्यंत हा प्रवास सुरुच राहतो.
▪️सायकल समवेत तंबू शिवाय राहण्यासाठी सुविधा बरोबर आणलेल्या आहेत .
▪️जेवण मात्र मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये घेतात.
सनीद यांच्याबरोबर त्यांचा १९ वर्षीय सहकारी अभिषेक असून तो देखील सायकल प्रवासात सहभागी आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकल प्रवासासाठी निघालेल्या दोन मित्रांचे आतापर्यंत ३ हजार किलोमीटर प्रवास पूर्ण झाला आहे.
▪️उर्वरित ३ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी अजून त्यांना तिनं महिने लागणार आहेत.
▪️मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करत असताना सनीद आणि अभिषेक यांचें ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.