ठाणे : निलेश घाग भिवंडीतील गोदामांचा देशभरातील सर्वात मोठा पट्टा आता थेट शहापूर, मुरबाड पर्यंत विस्तारण्याचे संकेत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या संपूर्ण व्यापार उदिमाला कायदेशीर कक्षेत आणत थेट मुरबाड पर्यंत ‘Logistic पार्क’साठी आरक्षित क्षेत्र निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Thane जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्या पर्यंत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आतापर्यंत भिवंडी, पडघा, पनवेल, उरण पर्यंत मर्यादित असलेल्या गोदामांचा विस्तार या नव्या पट्टयात होऊ शकेल. शहापूरपुढे मुरबाड पर्यंतचा बराचसा भाग आता हिरव्या वनराईने बहरला आहे. काही भागांत हिरव्या क्षेत्राची आरक्षणे आहेत. या भागात कमीत कमी चटई क्षेत्राचा वापर करून गोदाम क्षेत्राला मान्यता देता येईल, असे नियोजन महानगर विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. प्राधिकरणातील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला.
मुंबईच्या वेशी-वरील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा, नवी मुंबई उरण, पनवेल पट्टय़ात गेल्या काही वर्षांपासून गोदामांचे मोठे क्षेत्र विकसित झाले आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदराजवळ असलेल्या उरण, पनवेल बरोबरच अनेक कंपन्यांनी भिवंडी, पडघा भागात आपली व्यापार दळणवळण केंद्रे (लॉजिस्टिक पार्क) सुरू केली आहेत. लाखोंचा रोजगार निर्माण करणाऱ्या या केंद्रांमध्ये अत्यावश्यक रस्ते, इतर नागरी सुविधा नाहीत. अनेक वर्ष कोणत्याही ठोस नियोजना शिवाय ही व्यापर केंद्र सुरु आहेत. ही व्यापार केंद्रे आता कोंडीची मोठी ठिकाणे झाली आहेत. त्याचा फटका भिवंडी, पडघा, उरण, पनवेल भागातील शहरांना बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी या व्यापार दळणवळण केंद्रांचा विस्ताराचे नियोजन आहे.
जाहिरात