आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ आजच्या राशीभविष्यात.
▪️मेष (ARIES) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी आणि निम-सरकारी कामात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुख मिळेल आणि सुसंवाद राहील. प्राप्तीचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
▪️वृषभ (TAURUS) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस नवीन कामाचं नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
▪️मिथुन (GEMINI) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळं नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद करू नका. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.
▪️कर्क (CANCER) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळं आज संयम राखणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडं लक्ष दिलं नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. नवे काम सुरू न करणे हितावह राहील.
▪️सिंह (LEO) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भागात असेल. आज आपल्या दाम्पत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति, पत्नी दोघापैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी धैर्याने वागावं. सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आनंद देणारा नसेल.
▪️कन्या (VIRGO) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भागात असेल. आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख – शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारून त्यात यशस्वी व्हाल.
▪️तूळ (LIBRA) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भागात असेल. आज आपण बौद्धिक कामे आणि चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती, सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद-विवाद आणि चर्चेत पडू नका. आरोग्याच्या बाबतीत पचनक्रिये संबंधी तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास सुखदायक ठरेल.
▪️वृश्चिक (SCORPIO) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भागात असेल. आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्यांशी पटणार नाही आणि त्यामुळं मनाला वेदना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान आणि सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे किंवा कागदपत्रे करण्याविषयी जपून राहावं. स्त्रीवर्ग आणि पाण्यापासून नुकसानीची शक्यता आहे.
▪️धनू (SAGITTARIUS) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भागात असेल. आज एखाद्या गूढ आणि रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभ संभवतो. लहान भावंडांशी चांगले सुत जमेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडू शकेल.
▪️मकर (CAPRICORN) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भागात असेल. आज आपली उक्ती आणि कृतीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर-सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी उदभवतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्यानं लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावं लागेल.
▪️कुंभ (AQUARIUS) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भागात असेल. आज आपण शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. गूढ विषयांची गोडी लागेल.
▪️मीन (PISCES) : कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भागात असेल. आज आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावं लागेल. एकाग्रता कमी असल्यानं आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल. मित्र-स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल. जामीन किंवा कोर्ट-कचेरी प्रकरणात न पडणं अधिक चांगलं ठरेल.