आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ आजच्या राशी भविष्यात
▪️मेष (ARIES) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज शारीरिक, मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळं खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणं योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत राहिल्यामुळं द्विधा अवस्थेत अडकाल. आज कोणाला जामीन राहू नये.
▪️वृषभ (TAURUS) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात आणि व्यापार – व्यवसायात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख आणि संपर्क यांमुळं लाभ होईल. संतती आणि पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दांपत्यसुख उत्तम मिळेल.
▪️मिथुन (GEMINI) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्यानं मनास प्रसन्न वाटेल. मान – सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आज सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊन आपला मार्ग मोकळा होईल.
▪️कर्क (CANCER) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. मातुल घराण्याशी संबंध दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील. तसेच सरकारकडून ही फायदा संभवतो.
▪️सिंह (LEO) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. मानसिक शांतता लाभण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावेत.
▪️कन्या (VIRGO) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश आणि कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार – व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे इत्यादींची खरेदी केल्यानं खुश व्हाल. मित्रांसह प्रवासाचा आनंद लुटाल.
▪️तूळ (LIBRA) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. खर्च वाढणार नाही याकडंही लक्ष द्या. कामात सफलता आणि यश प्राप्त होईल.
▪️वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज आपण वाद – विवादात अडकाल. संततीविषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्यानं त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स आणि सट्टा ह्यात गुंतवणूक न करणं हितावह राहील. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे यथोचित यश सुद्धा मिळेल.
▪️धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज मन अनुत्साही असल्यामुळं मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावं. धनहानी आणि मानहानी संभवते. आईच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील. छातीचं दुखणं त्रास देऊ शकते.
▪️मकर (CAPRICORN) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस मित्र – परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. स्वास्थ्य टिकून राहील. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता.
▪️कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थिती असल्यानं निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्यानं कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही. कामे यशस्वी होण्यास उशीर लागेल.
▪️मीन (PISCES) : आज चंद्र रास बदलून मीन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्यानं नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र आणि कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते. एखाद्या प्रवासात किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल.