आजचे राशीभविष्य : आज शनिवार ‘या’ राशींना मिळेल कामात यश आणि नशिबाची साथ; वाचा राशीभविष्य …

Spread the love

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घ्या ज्योतिषी सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात.

▪️मेष (ARIES) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात भागात असेल. आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.

▪️वृषभ (TAURUS) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भागात असेल. आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबीयांसह सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे झाल्यानं वेळ आनंदात जाईल. शरीर आणि मनाला प्रसन्नता वाटेल. सार्वजनिक जीवनात यश मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून बातम्या मिळतील.

▪️मिथुन (GEMINI) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भागात असेल. आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाच वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश, कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील.

▪️कर्क (CANCER) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भागात असेल. आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया त्रासाचा राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमीजनांत वाद-विवाद होऊन रुसवे-फुगवे होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण आपणास अडचणीत टाकेल. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील.

▪️सिंह (LEO) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भागात असेल. आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळं निराशा येईल. पाण्यापासून सावध रहा. नोकरीत स्त्री वर्गापासून जपून राहा.

▪️कन्या (VIRGO) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भागात असेल. आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ आणि रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.

▪️तूळ (LIBRA) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भागात असेल. आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्यानं कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. आरोग्य बिघडेल. अवैध प्रवृत्तीत सहभागी होऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.

▪️वृश्चिक (SCORPIO) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भागात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक, मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. मित्राकडून भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ आणि प्रवास संभवतात. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल.

▪️धनू (SAGITTARIUS) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या असेल. आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल. एखादी दुर्घटना संभवते. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचलावे. निरुपयोगी कामांवर आपली शक्ती खर्च होईल.

▪️मकर (CAPRICORN) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्‍यांची व्यापारात व नोकरदारांची नोकरीत प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.

▪️कुंभ (AQUARIUS) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दशमात भावात असेल. आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी – व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढती व धनप्राप्ती संभवते. कौटुंबिक जीवन आनंदी राहून आपली मान-प्रतिष्ठा वाढेल.

▪️मीन (PISCES) : वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजच्या दिवसाची सुरूवात भीती आणि उद्विग्नता ह्याने होईल. शरीरास आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. नशिबाची साथ मिळणार नाही. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. संतती हे आजच्या चिंतेचे प्रमुख कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.

🔸️एस्ट्रो सरिता शर्मा -9310820945*
🔸️वैदिक, केपी, अंकज्योतिष, मोबाइल अंकज्योतिष, ,जैमिनी, नाडी, टैरो…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page