११:०० वाजता पाळले जाणार दोन मिनिटे मौन.
✒️ जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 रत्नागिरी | जानेवारी ३०, २०२३.
▪️ देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर सर्व कामकाज थांबवून आदरांजली वाहिली जाते. त्यानुसार ३० जानेवारी २०२३ रोजी दोन मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळायचा आहे.
▪️ त्यानुसार सोमवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शासकीय, निमशासकीय सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी ते जेथे असतील तेथे उभे राहून दोन मिनिटे मौन (स्तब्धता)पाळावे. त्यानंतर ठीक ११.०३ वाजता मौन संपल्याचा इशारा भोंगा वाजविला जाणार आहे. नगरपालिका हद्दीत नगर पालिकेने वेळेत भोंगा वाजविण्याचे काम करावयाचे आहे.असे निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी श्री. श्रीकांत गायकवाड यांनी कळविले आहे.