मुळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर करा ‘ही’ योगासने, अनेक समस्या होतील दूर…

Spread the love

मुळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर करा ‘ही’ योगासने, अनेक समस्या होतील दूर
मूळव्याध ही गंभीर समस्या असून यामुळे अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. मूव्याध झाल्यानंतर खाली बसताना आणि उठताना अनेक वेदना होतात. त्यामुळे मुळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित योगासने करा.

मुळव्याधापासून आराम मिळ्वण्यासाठी ही योगासने नियमित करा…



आरोग्यमंत्र- बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून लागल्यानंतर हळूहळू शारीरिक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीराला पचन होईल असे पौष्टिक अन्नपदार्थ खावेत. ज्यामुळे शरीरसंबंधित समस्या उद्भवणार नाहीत. मूळव्याध ही गंभीर समस्या असून यामुळे अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. मूव्याध झाल्यानंतर खाली बसताना आणि उठताना अनेक वेदना होतात. सतत बाहेरचे अननपदार्थ खाणे, अपुरी झोप, अतितिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे मूळव्याधीची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे आहारात अतितिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करू नये.

मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वाराच्या आत आणि बाहेरील नसांना सूज येते, ज्यामुळे मस्से तयार होतात आणि प्रचंड वेदना होऊ लागतात. . बद्धकोष्ठता,गर्भधारणा, लठ्ठपणा, अधिक वेळ एकाच जागेवर बसून राहणे, अन्नपदार्थांमधील फायबरचे प्रमाण कमी झाल्यानंतर मूळव्याधीची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

मुळव्याधापासून आराम मिळ्वण्यासाठी ही योगासने नियमित करा:

▪️उत्तानासन:

सकाळी उठल्यानंतर योगासने किंवा व्यायाम केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या कमी होतील. योगासने नियमित केल्यास प्रभावी फरक दिसून येतो. मूळव्याधीची समस्या उद्भवल्यानंतर नियमित उत्तानासन करावे. उत्तानासन करतात सगळ्यात आधी योगा मॅटवर ताठ उभे राहा. त्यानंतर दिर्घ श्वास घ्या आणि हात वरच्या दिशेकडे घेऊन जा. त्यानंतर श्वास सोडताना पुढे वाकून पायांच्या बोटांना स्पर्श करा. हे आसन करताना गुडघे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. 5 ते 6 सेकंड थांबून पुन्हा हात वर करा. या आसनाचा नियमित सराव केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.

उत्तासन केल्यामुळे शरीराच्या हालचालींमध्ये वाढ होते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. योगासन करताना तुम्ही रोज वेगवेगळी आसन करू शकता. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी नियमित उत्त्सान करावे.

▪️बद्ध कोणासन:

सकाळी उठल्यानंतर नियमित बद्ध कोणासन केल्यामुळे शरीराच्या खालच्या बाजूची लवचिकता वाढते. शिवाय शरीराचे इतर अवयव मजबूत होतात. त्यामुळे सकाळी उठून नियमित योगासने करावीत.बद्ध कोणासन करताना सगळ्यात आधी योगा मॅटवर ताठ बसा. त्यानंतर दोन्ही पायांचे तळवे मंडी घालून बसून चिटकवा. हे आसन १ मिनिटभर करण्याचा प्रयत्न करा.नंतर पाय मोकळे करा. हे आसन नियमित केल्यास मूळव्याधीची समस्या नाहीशी होईल आणि आराम मिळेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page