भाजपा नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांचे प्रतिपादन
आजिवली/डिसेंबर/२८/२०२३-
कोकणात शाश्वत विकास नाही, कोकणात रोजगार नाही, कोकणातील लोकांचे जीवनमान अजूनही उंचावलेले नाही, शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत अशा एक ना अनेक समस्या दृष्टीस पडतात. केंद्रात मा. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली तर राज्यात शिंदे-फडणवीस शासनाच्या माध्यमातून विकासाचा ओघ सुरू आहे. दोन्ही सरकारे जनतेला समस्यामुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहेत. मात्र सर्वांत मोठी समस्या ही आहे की येथील लोकप्रतिनिधींकडे विकासाचा दृष्टिकोन नाही.
कोकणात पर्यटन व्यवसाय तेजीत येण्यासाठी नियोजनबद्ध पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यातून रोजगार उपलब्ध होतील. उद्योग-प्रकल्प येणे गरजेचे आहे त्यातूनही रोजगार-व्यवसाय वाढीस लागतील. त्यामुळे मुंबईकडे वळणारी सुशिक्षीत युवा पिढी गावातच राहून आपले जीवन आनंदाने जगेल. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल. शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येईल. आणि गाव समृद्ध होईल.
यावेळी राजापूर (पू.) तालुकाध्यक्ष श्री. भास्कर सुतार, सरपंच श्री. संजय राणे, अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.