
‘बिग बॉस १६’ शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच शोचा फिनाले पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत सर्व स्पर्धक फिनालेचा भाग बनण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, स्पर्धक टीना दत्ताचे शोच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे. टीना दत्ता शोमधून बाहेर पडली आहे.
‘बिग बॉस १६’च्या फिनालेच्या काही दिवस आधी टीना दत्ताला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. खरं तर, टीना दत्ताच्या फॅन पेजवर तिच्या एलिमिनेशनसंदर्भात एक स्टोरी शेअर करण्यात आली आहे, ज्यानंतर टीना घरातून बाहेर पडल्याची बातमी चर्चेत आहे. टीना दत्ता, प्रियांका चौधरी, शालीन भानोत आणि शिव ठाकरे यांना गेल्या आठवड्यात नामांकन देण्यात आले होते. टीनाला सर्व स्पर्धकांमध्ये सर्वात कमी मते मिळाल्याने ती बाहेर पडली आहे.
‘बिग बॉस १६’ मधील टीनाचा प्रवास संपुष्टात आला आहे. मात्र यापूर्वी, अभिनेत्रीला तेलगू चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे, ज्यामध्ये ती मुख्य कलाकार म्हणून काम करेल. याशिवाय टीना दत्ताला ‘दुर्गा शो’ आणि ‘चारू’साठी देखील ऑफर देण्यात आली आहे.