जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानतर्फे आजपर्यंत ५४५१६ कुपिका रक्त संकलन…

Spread the love

रविवारी विक्रमी १६३७४ जणांचे रक्तदान

नाणीज, दि. १९:- जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे सुरू असलेल्या महारक्तदान कॅम्पमध्ये १० फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधी ५४५१६ रक्त कुपिकांचे संकलन झाले. रविवारी १८ फेब्रुवारी या एकाच दिवशी विक्रमी १६३७४ कुपिका रक्तसंकलन झाले. हे कॅम्प २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने ही महारक्तदान शिबिरे सुरू आहेत. त्याला स्व-स्वरूप संप्रदाय व लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लोक उत्स्फूर्तपणे रक्तदान करीत आहेत.आतापर्यंत सर्व विभागात रक्तदानासाठी मोठी गर्दी झाली होती.

मुख्यपीठ नाणीजधाम विभागात रविवारपर्यंत ७९ कॅम्प झाले. त्यात ७०७९ कुपिका रक्तसंकलन झाले.
उपपीठ मराठवाडा व मुंबई उपपीठ आत्तापर्यंत रक्तसंकलनात अग्रेसर आहेत. मराठवाड्यात आजपर्यंत १४५ कॅम्प झाले. त्यात १४६५७ कुपिका रक्तसंकलन झाले. मुंबई उपपीठाचे ८२ कॅम्प झाले. त्यात १००८३ कुपिका रक्तसंकलन झाले.


उपपीठ पश्चिम महाराष्ट्रात ९४ कॅम्प होऊन त्यात ८०७७ कुपिका रक्तसंकलन झाले. पूर्व व पश्चिम विदर्भात एकूण ८१ कॅम्प झाले. तिथे ७१२३ कुपिका रक्तसंकलन झाले. उपपीठ उत्तरमहाराष्ट्रतर्फे ६८ कॅम्प झाले. त्यात ६०३१ कुपिका रक्तसंकलन झाले. उपपीठ छत्तीसगड मध्ये दोन कॅम्पमध्ये ९४ कुपिका रक्तसंकलन झाले. उपपीठ गोवा येथे १९ कॅम्पमध्ये ९३८ कुपिका रक्तसंकलन झाले. उपपीठ मध्यप्रदेशमध्ये एक कॅम्प होऊन त्यात ६५ कुपिका रक्तसंकलन झाले. उपपीठ टेलांगणातर्फे १० कॅम्प होऊन ४१९ कुपिका रक्तसंकलन झाले. आशा तर्हेने एकूण ५८१ कॅम्पमध्ये ५४५१६ कुपिका रक्तसंकलन झाले.
या महारक्तदान शिबीरामध्ये रविवारी १८ फेब्रुवारी २०२४ रोजी एकाच दिवशी विक्रमी रक्तदान झाले. एकूण १५३ कॅम्पमध्ये १६३७४ कुपिका रक्तसंकलन झाले. गेल्या नऊ दिवसातील हा विक्रम आहे.


रक्तदानाचे हे कॅम्प २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. त्यात अधिकाधिक लोकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व प.पू. कानिफनाथ महाराज यांनी केले आहे. हे रक्त संकलन महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेसाठी सर्व रक्तपेढ्या करीत आहेत. त्याचा उपयोग सर्व शासकीय रुग्णालयातील गरजूंना होणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page