‘ही’ महिला चालवते ४१ हजार कोटींची मद्याची कंपनी, पगाराचा आकडा पाहून थक्क व्हाल!

Spread the love

मोठ्या कॉर्पोरेशन्सपासून ते अत्याधुनिक स्टार्ट अप्सपर्यंत प्रत्येक उद्योगात महिला व्यवसाय मालक म्हणून भरभराट करीत आहेत. व्यवसायात यशस्वी झालेल्या महिलेचे असेच एक उदाहरण म्हणजे हिना नागराजन

खरं तर महत्त्वाचे सांगायचे झाल्यास आता डियाजिओ इंडिया चालवणार्‍या महिलेचे नाव हिना नागराजन असून, ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या मद्य कंपन्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे त्या केवळ कंपनीच्या सीईओ नाही, तर व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… डियाजिओ इंडियाच्या प्रमुख या नात्याने त्या कंपनीचे नफा-तोटा ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अनुपालन आणि गुंतवणुकीपर्यंतचे काम पाहतात. भारतातील व्यवसाय प्रमुख होण्यापूर्वी हिना यांनी डियाजिओच्या आफ्रिका इमर्जिंग मार्केट क्षेत्राचे नेतृत्व केलेय.

३० वर्षांचा व्यवसाय चालवण्याचा अनुभव..

हिना नागराजन यांची सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे डियाजिओपूर्वी त्यांनी FMCG क्षेत्रात सुमारे ३० वर्षे घालवली. त्यांनी Reckitt Benckiser ची मूळ कंपनी Reckitt, Mary Kay India आणि Nestle यांसारख्या कंपन्यांमध्ये नेतृत्व पदावर काम केले आहे. त्यांना २,७५,००,००० रुपये मूळ वेतन आणि २,५८,२६,८५० रुपयांचे भत्ते (BOA) देईल. त्यांचे वर्षभरातील पीएफ योगदान ३३,००,००० रुपये होते. त्यांना १३,२२,७५० रुपये ग्रॅच्युइटी मिळाली. त्यांना वार्षिक सीटीसी ८ कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.

अभ्यासातही अव्वल…

बिझनेस चालवण्यात पारंगत असण्याबरोबरच हिना नागराजन यांनी अभ्यासातही टॉप केले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमची पदवी घेतली. त्यानंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. जुलै २०२१ मध्ये त्यांना Diageo चे MD आणि CEO बनवण्यात आले. यानंतरच डियाजिओने विजय माल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ताब्यात घेतली. ३२६१ कर्मचारी असलेल्या कंपनीच्या भारतातील कामकाजाचे त्या नेतृत्व करतात. युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडचे बाजार भांडवल ४१००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०१६ पर्यंत विजय माल्ल्या या व्यवसायाची धुरा सांभाळत होते.

आयपीएल संघ मालक कंपनी..

डियाजिओ इंडिया आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मालक कंपनी आहे. या संघाची एकूण संपत्ती ८५०० कोटी रुपये आहे. विराट कोहली दीर्घकाळ या संघाचा कर्णधार होता. तो अजूनही या संघाचा सदस्य आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page