
चेंबूर ; प्रतिनिधी (प्रणिल पडवळ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार चेंबूर विधानसभेचे विभाग अध्यक्ष श्री.माऊली थोरवे, उपविभाग अध्यक्ष अविनाश पांचाळ, महिला उपविभाग अध्यक्षा सविताताई खैरे व शाखाध्यक्ष रोहिदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला शाखाध्यक्ष श्रीमती रेश्मा राऊत,रोजगार व स्वंरोजगार विभागसंघटक विवेक जागुष्टे , वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अनिल साळवी तसेच उपशाखा अध्यक्ष सुरेंद्र किरडवकर,शांताराम मेस्त्री, पोपट काळे,प्रकाश गोसावी, दशरथ झुंगारे,योगेश मसुरकर,महेश सडविलकर, श्रीकृष्ण माईन,संजय मासये यांच्या सहकार्याने ” एक स्वाक्षरी संतापाची” ही मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी चेंबूर विधानसभेतील मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

▪️यामध्ये चेंबूर प्रभागातील नागरिकांना जाहीर अवाहन करण्यात आले आहे की सध्या राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्याबदल राग व्यक्त करण्यासाठी खारदेव नगर सावली नाका येथे मनसेच्या वतीने एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली आहे. नागरिकांना विनंती आहे की आपण बॅनर वर सही करून या राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्याविरुद्ध आपला संताप व्यक्त करावा ही विनंती.
▪️ ज्या उमेदवाराला ज्या पक्षातून निवडून दिले तो उमदेवार स्वत:च्या स्वार्थासाठी वा सत्तेसाठी पक्षांतर करत आहे .महाराष्ट्र राज्यात चालू असलेल्या या गलिच्छ राजकारणविरोधात सामान्य नागरिकांच्या मनात असलेला संताप व्यक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती असे स्पष्टीकरण माऊली थोरवे यांनी दिले.
चेंबूरमधील नागरिकांकडून या मोहिमेला उत्सुफुर्त प्रतिसाद मिळाला
जाहिरात

