
*मुंबई-* माझ्याकडे मुस्लिम आणि ख्रिश्चन मते आहेत. या मतांच्या भरोशावर मी त्यांना पाहून घेईल. तू राहशील नाहीतर मी राहील, अशी भाषा उद्धव ठाकरे वापरत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जर ही भाषा ऐकली असेल, तर त्यांना काय वाटले असेल? याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा, असे आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तुमच्या पक्षाच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत. पाकिस्तानचे झेंडे असलेल्या मिरवणुका निघत आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरोशावर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना पाहून घेऊ, अशी भाषा वापरत आहात का? असा प्रश्न यांनी उपस्थित केला. ही बाळासाहेबांची शिकवण आहे का? असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना ‘आता एक तर तू राहशील किंवा मी’ अशा शब्दांत अत्यंत निर्वाणीचा इशारा दिला. यानंतर भाजपच्या वतीनेही जोरदार पलटवार करण्यात आला आहे. या राज्याला विकासाकडे नेणारे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे. तुमची आणि त्यांची काय क्षमता आहे? असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. या राज्याला दिशा देणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोलला आहात त्यामुळे तुमची मानसिक दिवाळीखोरी महाराष्ट्रातील जनतेला समजली आहे. तुम्ही जातीपातीचे राजकारणावर उतरले आहात. तुम्ही धर्माच्या आधारावर मत घेण्याची भाषा करत आहात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला सोडणार नाही. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला राजकारणातून कमी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.
*उद्धव ठाकरे यांचे भाषण महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाला शोभा देणार नाही – दरेकर*
उद्धव ठाकरे यांचे आव्हान अत्यंत पोकळ अशा प्रकारचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण समर्थपणे केले आहे. पाच वर्षे त्यांनी उत्तम मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. आता देखील दोन्ही पक्षाला सोबत घेऊन राज्यातील सरकार जनतेच्या हितासाठी त्यांच्या समन्वयातूनच नीट चालू आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी कमालीचा द्वेष आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भावना त्यांच्या मनात उफाळून येत असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वाईट बोलल्याशिवाय त्यांच्या मनाचे समाधान होत नाही. याच माध्यमातून ते आपला राग भागवून घेतात. मात्र, देवेंद्र फडणवीस कधीही नाक्यावर भांडण केल्यासारखीभाषा वापरत नाहीत. ते आरेला कारे न करता आपल्या कामातून प्रत्युत्तर देतात. असे देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले तर ते महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाला शोभा देणार नाही. अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
*आघाडीतील कोणताही नेता त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही, त्यामुळे ठाकरेंना वैफल्य…*
*गुर्मी उतरण्याचा काम हे मतदार बंधू भगिनी करत असतात. ना रावण गुर्मी उतरवू शकला, ना कौरव कोणाची गुर्मी उतरव शकले. लोकशाहीमध्ये एक व्यक्ती कोणाचीच गुर्मी उतरवू शकत नाही. तर लोकशाहीमध्ये गुर्मी उतरवण्याचे काम हे मतदार करू शकतात हे ठाकरे यांनी लक्ष्यात घ्यावे. वास्तविक महाविकास आघाडीमध्ये कोण मार्गदर्शक आहे? असा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शन मानायला काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही. अनेकदा मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानंतरही महाविकास आघाडीतील कोणताही नेता त्यांना मुख्यमंत्री म्हणून मान्यता देण्यास तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना वैफल्य आले आहे. अशा वैफल्यातूनच ते अशा प्रकारे वक्तव्य करत असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.