चाळीशीतही तरुण दिसायचं? आठवड्यातून २ वेळा वापरायलाच हव्यात या गोष्टी..

Spread the love

आपण नेहमी तरुण दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. महिलांमध्ये तर तरुण दिसण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू असते. मग तरुण दिसण्यासाठी हेअरस्टाईल, मेकअप, कपडे, पार्लर अशा सगळ्याची काळजी घेतली जाते. मात्र यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणात पैसे खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते. पण मुळातच आपण कायम तरुण दिसावे यासाठी आपला आहार-विहार, जीवनशैली चांगले असणे गरजेचे असते. मात्र विशिष्ट वयानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात होते

काहींना अगदी कमी वयातच या सुरकुत्या येतात, त्यामुळे या महिला लहान वयातच वयस्कर दिसायला लागतात. सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर, प्रदूषण, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे या समस्येत भर पडली असून गेल्या काही वर्षात कमी वयात मोठे दिसणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नियमितपणे योग्य पद्धतीचे स्कीन केअर रुटीन फॉलो केले तर आपण दिर्घकाळ तरुण दिसू शकतो. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा काही गोष्टी केल्यास त्याचा कसा फायदा होतो पाहूया…

१. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी

त्वचा सतत हायड्रेट राहणे अतिशय गरजेचे असते. त्यासाठी आपण फेस सीरम आणि फेस ऑईलचा वापर करतोच, पण तेवढे पुरेसे नसते. म्हणूनच आठवड्यातून किमान २ वेळा तरी शीट मास्कचा वापर करायला हवा. या मास्कमुळे त्वचा चांगल्या प्रमाणात हायड्रेट होण्यास मदत होईल. याचा चांगला इफेक्ट हवा असेल तर रात्री झोपताना शीट मास्क चेहऱ्याला लावायला हवे. 

२. फेस स्क्रब

स्कीन केअरमध्ये आपण अनेक गोष्टी करतो पण त्या करत असताना त्वचेची रंध्रे उघडी होतात ती साफ करणे गरजेचे असते. यामुळे त्वचा सुंदर तर दिसतेच, यासाठी एक्सफॉलिएशन करणे गरजेचे असते. चेहऱ्याला मसाज करताना हाताचा दाब कमी ठेवा आणि १० मिनीटे चेहरा स्क्रब करत राहा. घरातील नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन आपण चेहऱ्यासाठी हे स्क्रब तयार करु शकतो. आठवड्यातून किमान २ वेळा असे स्क्रब केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

३. फेस मसाज 

चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स करण्यासाठी आणि त्वचेत इलॅस्टीसिटी येण्यासाठी चेहऱ्याला नियमित मसाज करायला हवा. जमेल तसा मसाज रोजच करा, पण विविध साधनांच्या माध्यमाने केला जाणारा मसाज आठवड्यातून किमान २ वेळा तरी करायला हवा. त्वचेतील इलॅस्टीसिटी दिर्घकाळ चांगली ठेवायची असेल आणि कायम तरुण दिसायचे असेल तर असा मसाज करणे अतिशय फायद्याचे ठरते. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page