*नागपूर :* देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुती सरकारच्या मागच्या कार्यकाळात मंत्रिपदासाठी वेटिंगवरच राहिलेल्या शिंदेच्या शिवसेनेमधील काही प्रमुख नेत्यांचा झालेला शपथविधी हा लक्षवेधी ठरला़.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुतीमधील घटक पक्षांतील मिळून ३९ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधीवेळी महायुती सरकारच्या मागच्या कार्यकाळात मंत्रिपदासाठी वेटिंगवरच राहिलेल्या शिंदेच्या शिवसेनेमधील काही प्रमुख नेत्यांचा झालेला शपथविधी हा लक्षवेधी ठरला़.
शिंदेंच्या शिवसेनेतील संजय शिरसाट, भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांनी आज मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांमध्ये संजय शिरसाट, भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक हे आघाडीवर होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संजय शिरसाट, भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळवण्याची अपेक्षा होती. मात्र विविध कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने या नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये या तिन्ही नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
दरम्यान, आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात शिंदेंच्या शिंदेंकडून एकूण ११ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या आमदारांमध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय राठोड, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला ९ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदं मिळाली आहे.