नाशिक: राज्यभर गाजलेल्या कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ कोटींच्या अपहाराप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष संशयित पंकज सुभाष पारख यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारी (दि. १०) न्यायालयाने वाढ केली. त्यामुळे संशयित पारखला पुढील पाच दिवस पोलिस कोठडीतच काढावे लागणार आहे.
गेल्या गुरुवारी (दि. २) मध्यरात्री तिडके कॉलनीतून ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने संशयित पारखला अटक केली. तेव्हापासून तो कोठडीत आहे.
दरम्यान, संशयित पारख आजारपणाचा फायदा घेऊन तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.