दिवा चौकाजवळ बसण्याऱ्या बेवड्यांच्या थव्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण

Spread the love

भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपना भगत यांनी पोलिसांत केली कारवाईची मागणी

दिवा (प्रतिनिधी) दिवा चौकाजवळ सध्या रोजरोसपणे,रात्री अपरात्री मद्यपींकडून उच्छाद मांडण्यात येत असून नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.दिवा चौक हे मोक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे दारु पिण्यासाठी बसणारा थवा येथून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना भितीची वातावरण तयार करीत असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.महिलांची अडचण लक्षात घेता येथील बेवड्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी दिवा भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत यांनी ठाणे पोलिसांना तक्रारीचे निवेदन दिले आहे.

दिवा शहराच्या वेशीवरील शिळरोडवरील दिवा टर्निंग परिसरात खाद्यपदार्थांच्या टपऱ्या,इमारतींचे आवार आणि रस्त्यालगत बिनधास्त मध्यपींचे अड्डे तयार झाल्याचे चित्र आहे.येथे अनेक दारुडे थव्याने बसलेले दिसून येत आहे.या मद्यपींकडून नागरिकांना दमबाजीबरोबरच महिलांची छेड काढण्याचे प्रकार सुरु आहेत.त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.याठिकाणी आजूबाजूच्या परिसरात दाटीवाटीची वस्ती असून येथे अनेक महिला रात्री अपरात्री स्टेशन परिसरातून येजा करीत असतात.महिलांची ही अडचण लक्षात घेता आता भाजपच्या महीला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत या मैदानात उतरल्या आहेत.त्यांनी थेट ठाणे पोलिसांत तक्रारीचे निवेदन दिले आहे.

दिवा शिळ रोडवरील दिवा टर्निंग परिसरातून साबे गाव,दिवा स्टेशन आणि आगासनकडे जाण्यासाठी रस्ते आहेत.याठिकाणी वाईन शाप व बियर शापमधून दारुच्या बाटल्या विकत घेवून बेवडे खुलेआमपणे मद्यपान करीत आहेत.या परीसरात त्यांना चकण्यासाठी विविध टपऱ्या रस्त्यालगत व रस्त्याच्या परिसरात अनधिकृतपणे सुरु ठेवण्यात आल्या आहेत.या टपऱ्यांमधून विकल्या जाणाऱ्या पदार्थांची कोणतीही तपासणी न करता नागरिकांना त्या खाण्यास दिल्या जात आहेत.त्यामुळे या अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या टपऱ्यांवरही कारवाई करा अशी मागणी सौ.सपना भगत यांनी केली आहे.

दहा दिवसांचा अल्टिमेटम

दिवा चौकाजवळ बेवड्यांच्या थव्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे अनधिकृतपणे बसणाऱ्यांना व महिलांना लज्जा उत्पन्न करणाऱ्यांवर येत्या दहा दिवसांत कारवाई करा अन्यथा दिवा भाजपा महिला मोर्चाच्यावतीने बेवडे हटाव दिवा बजाव आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page