मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ठोस कारवाई करत नसल्याने युवा एकता सामाजिक संस्थेने उपसले उपोषणाचे हत्यार

Spread the love

संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत, मुचरी ग्रामपंचायत व मौजे असुर्डे ग्रामपंचायत या गावातील ग्रामपंचायती मध्ये झालेल्या गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरतजी चौघुले यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु त्यांनी अद्याप तक्रारीवर शासकीय नियमानुसार संबंधितावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.

गटविकास अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली परंतु ते देखील शासकीय नियमानुसार तक्रारीची दखल घेण्यास सतत टाळटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने स्मरणपत्र काढून देखील कोणतीही कारवाई होत नाही यावरून असे दिसून आले की मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तिन्ही ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामसेवक यांचे एकमेकांशी साटेलोटे असून त्यांना या कारवाईतून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे प्रत्येक वेळी दिसून आले.

रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती केली आहे की गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच तिन्ही ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच , सदस्य व ठेकेदार यांनी लोकशाही असलेल्या या संघराज्याच्या नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामविकास विभागाच्या शासकीय नियमानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी संस्थामार्फत केली आहे.मागील एक वर्षापासून तिन्ही ग्रामपंचायत मधील नागरिक यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करत असून त्यावर अद्याप कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे आज दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून पंचायत समिती देवरूख या ठिकाणी तिन्ही ग्रामपंचायत च्या नागरिकांकडून अर्धनग्न स्वरूपात बेमुदत आमरण उपोषणाची हाक देण्यात आली आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page