मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे आज दिनांक 17 मे 2024 पासून दिनांक 23 मे 2024 पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या विविध गाड्यांच्या 41 फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम तसेच सीएसएमटी स्थानकानजीकच्या यार्डमध्ये हाती घेण्यात आलेल्या कामासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. दिनांक 17 ते 31 मे 2024 या कालावधीत हे काम चालणार आहे.
या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या विविध गाड्यांच्या तब्बल 41 फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. सीएसएमटी येथून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या जाहीर करण्यात आलेल्या नियोजनानुसार दादर तसेच पनवेल येथून सुटणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्यांचे आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांनी रेल्वे ब्लॉकमुळे झालेल्या बदलाची माहिती घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे हवा रेल्वेकडून करण्यात आले आहे.
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या जनशताब्दी, मांडवी, तेजस, कोकणकन्या एक्सप्रेस सह वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर देखील मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.