अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट,घातकफायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन….

Spread the love

नवी दिल्ली :- अमेरिकेकडून भारताला नवं गिफ्ट मिळाले आहे. जेट इंजिन बनवणारी कंपनी GE ने भारताला त्यांचे दुसरे इंजिन सोपवले आहे. या इंजिनचा वापर हलक्या लढाऊ विमानासाठी केला जाऊ शकतो. हे इंजिन LCA असलेले तेजस मार्क १ ए ला लावले जाऊ शकते. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला अशाप्रकारची १२ इंजिन कंपनीकडून मिळण्याची अपेक्षा आहे.


रिपोर्टनुसार, भारताला दुसरे GE 404 इंजिन मिळाले आहे. भारतीय हवाई दलाने ८३ LCA मार्क १ ए लढाऊ विमानांची ऑर्डर दिली होती. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेनंतर आणखी ९७ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. भारत-अमेरिका यांच्यातील या भागीदारीमुळे शेजारील पाकिस्तानची चिंता वाढली आहे.


संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेश सिंह यांनी म्हटलं की, भारताने तेजस मार्क १ ए लढाऊ विमानांसाठी GE F 404-IN20 इंजिनाची आयात पुन्हा सुरू केली आहे. GE मार्च २०२६ पासून प्रत्येक महिन्याला २ इंजिन पाठवू शकते. भारताने जनरल इलेक्ट्रिकसोबत ७६१ मिलियन डॉलरचा करार केला होता. त्या अंतर्गत लढाऊ विमानांसाठी इंजिन खरेदी केले जात आहेत.


भारताच्या हवाई दलाकडे अनेक लढाऊ विमाने आहेत. जे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी तयार असतात. प्रत्येक लढाऊ विमानाची क्षमता वेगवेगळी आहे. या लढाऊ विमानांच्या यादीत सुखोई Su-30 MKI, राफेल, तेजस, मिग २९, मिराज २०००, जगुआर आणि मिग २१ यासारख्या विमानांचा समावेश आहे.


दरम्यान, अलीकडेच महिंद्रा ग्रुपची महिंद्रा डिफेन्स सिस्टीम आणि ब्राझीलची मोठी एअरोस्पेस कंपनी एम्ब्रेअर यांच्यात मोठी संरक्षण डील झाली आहे. यात हवाई दलासाठी दारुगोळा, शस्त्रे आणि जवानांना ने-आण करण्यासाठी C-390 मिलेनियम हे मध्यम मालवाहू विमान भारतात तयार केले जाणार आहे. याचबरोबर दोन्ही देश टेहाळणी आणि कमांड सेंटर असलेली अवाक्स प्रणालीची विमाने बनविण्यासही सहकार्य करणार आहेत.

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page