उर्फी जावेदच्या निराळ्या स्टाईलने धरलं नेटकऱ्यांचं डोकं, बोल्डनेसच्या नावाखाली घातले ‘असे’ कपडे

Spread the love

उर्फी जावेदची निराळी स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. अलीकडेच ती मुंबईतील हॉटेलबाहेर स्पॉट झाली. यादरम्यान तिने असे काही परिधान केले होते की, तिचा लूक पाहून सर्वांचेच होश उडाले. उर्फीने यावेळी कोन स्टाईल ब्रालेट परिधान केलेली दिसली. यासोबत तिने मखमली धोती स्कर्ट कॅरी केला आहे. उर्फीची स्टाइल निराळी आहे, पण या लूकमध्येही ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

उर्फीने तिच्या लुकला न्यूड ग्लिटरी मेकअपने पूर्ण केले आहे. यासोबत तिने केस बांधले आहेत आणि कानात हूप इअररिंग्ज घातल्या आहेत. उर्फीचे हे रूप ज्याच्या नजरेस पडले, तो तिच्याकडे पाहतच राहिला.

आता या निराळ्या लूकमधील उर्फीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरवेळी प्रमाणेच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे, तर अनेक जण तिची प्रशंसाही करत आहेत.

विशेष म्हणजे, उर्फी जावेद अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. मात्र ‘बिग बॉस ओटीटी’चा भाग झाल्यानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून ही अभिनेत्री सतत चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स जगभर प्रसिद्ध झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page