“भारतीयांच्या रोगप्रतिकारक्षमतेचे रहस्य”

Spread the love

🔹️भारतीयांच्या विलक्षण रोगप्रतिकारक्षमतेचे रहस्य खालील 2 कारणांत आहे

▪️1) “प्राकृतस्तु बलं श्लेष्मा” हा महत्त्वाचा आयुर्वेदीय सिद्धांत आहे . श्लेष्मा म्हणजे कफधातु . अर्थात् , शरीर बलवान व रोग्यप्रतिकारक्षम असणे हे “प्राकृत कफाश्रित”आहे (हा कफ सर्दी-खोकल्याचा कफ नाही , तो वैकृत कफ असतो) आणि त्या प्राकृत कफनिर्मितीसाठी भावप्रकाशसारख्या आयुर्वेदीय ग्रंथांनी भारतीयांच्या स्वयंपाकघरातच, अन्ननिर्मितीच्या पद्धतीतच व्यवस्था लावून दिलेली आहे , ती म्हणजे “फोडणी” (आयुर्वेदिक नांव “स्नेह विचारणा”)
“अन्नाबरोबर घेतलेला स्नेह(तेल-तूप) हा बलदायक म्हणजेच प्राकृत कफ निर्माण करणारा असतो” हा या फोडणीमागचा महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि एकंदरच प्राकृत कफ-पित्त निर्मिती व वाताची समावस्था या फोडणीमधून कशी साध्य होते ते पाहू .
फोडणीमध्ये तेल-तूप व मसाल्याचे पदार्थ (मोहरी, जिरे, हळद, तिखट, मेथी, हिंग व गोडा/गरम मसाला) यांचा संयोग असतो व तेल-तूप विशिष्ट तापमानाला आले की हे मसाले त्यात विशिष्ट क्रमाने मिसळण्याची पद्धत आहे व हे तेल-तूप विशिष्ट तापले की नाही? हे समजण्याची सोपी खूण-युक्ती भावप्रकाशकारांनी सांगितली ती म्हणजे तेल-तुपात आधी मोहरी घालावी व ती तडतडायला लागली की इतर मसाले त्यात मिसळावेत . आता या फोडणीमधून प्राकृत कफ-पित्त निर्मिती व सम वाताचे कार्य कसे साध्य होते ते पाहू. सर्व मसाले सुगंधी आहेत, म्हणूनच त्यात पृथ्वी महाभूत आहे (तत्र गंधवती पृथिवी-तर्कसंग्रह)(पहिला पाऊस पडल्यावर मातीचा सुखावणारा सुगंध येतो), प्राकृत कफ हा पृथ्वी व जल महाभूताने युक्त असतो , तसेच मसाल्यांमधील तिखट व कडू रसाने व उष्ण-तीक्ष्ण वीर्याने स्नेहद्रव्यांचे पाचन होऊन, त्या तेलातील जल महाभूताने प्राकृत कफ-पित्त निर्मिती व विगुण वात शमनाचे कार्य होऊन वातही समावस्थेत राहतो. आपल्या आहारातील हिरवी मिरची, आले, लसूण, पुदिना यामुळे पाचन चांगले राहून आतड्यातील कुज नाहीशी होते व विकृत-दूषित पित्ताचे पाचन-शमन होते . आता रोगप्रतिकारासाठी याचा कसा उपयोग होतो , ते पाहू .
रोगजंतूंचा शिरकाव आपल्या शरीरांत होतो त्यावेळी आपल्या पांढऱ्या पेशी (WBC) त्याविरोधी प्रतिपिंडे (antibodies) तयार करतात, ते कार्य प्राकृत कफ-पित्ताने अधिक वेगाने होते, त्यासाठी प्रेरणा (stimulant) देण्याचे कार्य सम वाताचे आहे, फोडणीतील तेल-तुपाने समवाताची निर्मिती होते . विषाणूंसाठी कृत्रिम औषध नाही , आपल्या पांढऱ्या पेशींना तो विषाणू नवीन असेल तर त्यातील विशिष्ट प्रोटीन ओळखून त्याविरोधातील प्रतिपिंडे तयार करायला साधारणपणे 3 ते 5 दिवस लागतात, आयुर्वेदिक औषधींमुळे (षडंग, रौप्य, मौक्तिक आदी) ती क्षमता 1-3 दिवसांत येते एव्हढेच. परंतु, शेवटी ह्या विषाणूंचा नाश पांढऱ्या पेशींनी तयार केलेली प्रतिपिंडेच करतात, हे लक्षांत घ्यावे. ही पांढऱ्या पेशींची क्षमता up to date राहणे यालाच “रोगप्रतिकारक्षमता” म्हणतात व ती प्राकृत कफ-पित्त व समवात यांनी व या दैनंदिन फोडणीयुक्त अन्नग्रहणाने कशी साध्य होते ? हे आपण पाहिले, आता ही पांढऱ्या पेशींची क्षमता up to date राहण्यासाठी भारतीयांनी काही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम समाजात रूढ केले, ते कसे ते पाहू

▪️2) आमचे गांवागांवातील आठवडी बाजार , जत्रा-यात्रा यातून स्थानिक 40-50 गावांतील लोक एकत्र येतात , जिल्हास्थानी देखील मोठ्या जत्रा-यात्रांतून 300-400 गावांतून एकाच वेळी माणसे एकत्र येतात , पंढरपूर-ज्योतिबा-जेजुरी-पाली या सारख्या जत्रा यात्रांतून 4-5 प्रांतांच्या 2-3 हजार गावातून 7-8 लाख माणसे एकत्र येतात आणि दर 4 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यांतून तर सर्व भारतीय उपखंडातून 20-25 कोटी माणसे एकाच वेळी एकत्र येतात , त्यातून स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर मोठा प्रमाणावर विषाणूंची देवाण-घेवाण होते व आपल्या पांढऱ्या पेशींसाठी ती-ती प्रतिपिंडे बनवण्यासाठी ती एक तालीमच मिळून जाते व त्यांची व पर्यायाने भारतीयांची “रोगप्रतिकारक्षमता” up to date राहते , ती यामुळेच . पाश्चात्य व्यापाऱ्यानी 400-500 वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ भारतातून नेले, पण ही “फोडणीची” पध्दत नेली नाही व काही विशिष्ट ऐतिहासिक कारणांनी आग्नेय आशिया देखील मोठ्या प्रमाणात या “फोडणीच्या” पद्धतीपासून वंचित राहिला व त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक्षमता भारतीयांपेक्षा मागास राहिली, एव्हढेच खरे .

▪️3) भारतांत “महामारी” प्राचीन काळापासून आहे , त्याचे वर्णन आयुर्वेद ग्रंथातील “जनपदोध्वंस विमाननीय” (epidemic disease) अध्यायांत आहे, देवी (small pox), विसूचिका (कॉलरा), प्लेग (अग्निरोहिणी) असे रोग त्यात आहेत. या रोगाच्या प्रतिकारासाठी भारतीयांच्या आहारपद्धतीतूनच “immunity” निर्मिती आमच्या ऋषिमुनींनी केली व आदी शंकराचार्यांनी सनपूर्व पांचव्या शतकांत दर 4 वर्षांनी येणारे कुंभमेळे व दशनामी आखाडेही जनजागृतीसाठी निर्माण केले, कुठल्याही विशेष प्रसिध्दीशिवाय दर 4 वर्षांनी केवळ हे आखाडे व पंचांग या माध्यमांतून कोट्यवधी लोक आलम भारतातून एकाच काळांत 2 महिन्यासाठी एकत्र येतात, हा संस्कृतिविशेष आपण सर्वानीच लक्षांत घेऊन आपल्यात ही
“immuniti” मिळवण्यासाठी अशा पर्वणींचा जरूर लाभ घ्यावा

▪️4) प्रयागच्या कुंभाच्या वेळी पं. मदनमोहन मालवीय यांना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने “एव्हढी प्रचंड संख्येत माणसे एकत्र करायला प्रसिद्धीसाठी किती खर्च येतो ? ” असा प्रश्न विचारल्यावर पं. मालवीय यांनी लगबगीने एक पंचांग मागवले व एका ठिकाणी “महाकुंभ पर्वणी” या शब्दावर बोट ठेवून “हा शब्द छापायला जेव्हढा खर्च आला असेल तेव्हढाच” असे उत्तर दिल्यावर तो ब्रिटिश आश्चर्याने थक्कच झाला व “ही अशी फक्त तुम्ही भारतीयच करू शकता” असे म्हणता झाला .

▪️5) भीतीच्या किंवा दुःखाच्या मनोवस्थेत माणूस आकुंचित अवस्थेत असल्याने दुसऱ्या व्यक्तीबरोबर त्याची शारीरिक व मानसिक देवाण-घेवाण होऊ शकत नाही. पण जत्रा-यात्रा-कुंभमेळे याठिकाणी माणूस विलक्षण उत्साहाने भारलेल्या व एका उदात्त-सात्विक-राजस अवस्थेत असल्याने त्याच्या तेजोवलयातून (Aura) विषाणू व ही प्रतिरोधक्षमता यांची देवाण-घेवाण प्रचंड गतीने होत असते . कुंभासारख्या ठिकाणी वाहत्या पाण्याचे प्रफुल्ल ऊर्जेचे माध्यम मिळाल्याने ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया अधिक तीव्र व प्रभावी होते, शेवटी वाऱ्यापेक्षा जलीय माध्यम या प्रक्रियेसाठी अधिक सुयोजित ठरते .

  • वैद्य सुधीर रानडे,ठाणे
    *डॉ. प्रमोद ढेरे,

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page