
रत्नागिरी :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे ऑगस्ट २०२५ महिन्यात घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष एम. बी. बी. एस परीक्षेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळविले आहे. या संस्थेचा निकाल महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १०० टक्के लागला आहे. सन २०२४ या वर्षी झालेल्या प्रथम वर्ष एम. बी. बी. एस परीक्षेमध्ये देखील महाविद्यालयाचा निकाल राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच ९९ टक्के इतका लागला होता. या यशाबद्दल पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी अधिष्ठाता, डॉ. जयप्रकाश रामानंद तसेच सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकालातील क्रमवारी खालील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी १०० टक्के, राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे ९८.९० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग – ९८ टक्के, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर – ९७.९६ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार – ९६.९० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर ९६ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी – ९६ टक्के, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे – ९५.६० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर – ९५ टक्के, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई – ९४.४२ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज – ९४.४० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला – ९४.२० टक्के, टोपीवाला नॅशनल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई ९४.०७ टक्के, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई -९३.९३ टक्के, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर – ९३ टक्के, . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव – ९३ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर- ९३ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग ९३ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड -९२ टक्के, सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई ९१.५३ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर – ९१.५० टक्के, डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर – ९१ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती – ९० टक्के, आर्म फोर्ससेस मेडिकल कॉलेज, पुणे -९० टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव – ९८.९० टक्के, हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुंबई- ८९ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया – ८८.६६ टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे -८८ टक्के,
विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची विषयवार संख्या- औषधशास्त्र ८, सुक्ष्मजीवशास्त्र ७ व विकृतीशास्त्र ५ अशी आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*




