
दिवा:- दिवा विभागातील दातिवली तलाव हा दिवा शहरातील प्रमुख तलाव असून येथे गणेश विसर्जन व दुर्गा मातेचे विसर्जन केले जाते या तलावाला केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियाना अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत दातिवली तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने 5,73,23,876 खर्चास शिफारस केली आहे. या कामास महासभा ठराव क्रमांक102 दि.07/10/2022 अन्वये महापालिका फंडातून करावयाच्या खर्चाचे दायित्व स्वीकृतीस मान्यता घेण्यात आली आहे.सदर सुशोभीकरणचे काम यु.सी.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे परंतु सदर तलावाचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे चालू असून या संदर्भात वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तक्रार करण्यात आली होती परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज सकाळी दातिवली तलावाची संरक्षण भिंत कोसळून यात रिक्षा व मोटरसायकली पडल्या सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.परंतु संरक्षण भिंत कोसळल्या मुळे दिवा आगासन प्रमुख रस्त्याचा काही भाग खचलेला आहे त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेच्या प्रत्येक कंत्राट व कंत्राटावरील कामगारांच्या विम्याच्या संदर्भात शासनाचे उक्त परिपत्रकातील कार्यपद्धती व सूचनाप्रमाणे काटेकोर कारवाई करण्याची दक्षता विभागाने घ्यावी असे या वर्क ऑर्डर मध्ये प्रामुख्याने लिहिले असताना सुद्धा सदर कामाचे इन्शुरन्स हे संपलेले आहे तरी अशा बेजबाबदार हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे व सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे सदर कामाची पाहणी शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे महिला शहर संघटिका ज्योती पाटील विभाग प्रमुख नागेश पवार शनिदास पाटील रवी रसाल उपविभाग प्रमुख योगेश निकम संदीप राऊत सतीश मांढरेकर ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



