स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिऱी, रत्नागिरी शहरांत भरदिवसा वृद्ध महिलेला मारहाण करुन जबरी चोरी आरोपीना 24 तासात अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिऱीला मुद्देमाल हस्तगत…

Spread the love

रत्नागिरी / प्रतिनिधी : दिनांक 28/09/2024 रोजीसकाळी 08.45 वा. चे सुमारास हरी ओम मंगल कार्यालय (लता
टॉकीज) गाडीतळ येथील वॉशींग रॅम्प जवळ असलेल्या घरामधील एकटयाच असलेल्या एका वयोवृध्द महिलेला मारहाण व दुखापत करुन तिचे हातामधील दोन सोन्याच्या बांगडया व गळयामधील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून जबरी चोरी केलेली होती त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 370/2024 भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 309 (6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ नियुक्त करुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन सदरचा गुन्हा हा शेखर रमेश तळवडेकर याने त्याची पत्नी आश्लेषा शेखर तळवडेकर हीचे मदतीने केलेला असल्याचे निष्पन्न करुन गोपनीय माहीतीचे आधारे आरोपी (1) शेखर रमेश तळवडेकर, वय 47 वर्षे, (2) सौ. आश्लेषा शेखर तळवडेकर वय 48 वर्षे दोन्ही रा. ओम शांती प्लाझा, लक्ष्मी चौक, गाडीतळ रत्नागिरी मूळ रा. तळवडे ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग यांना 24
तासांचे आतमध्ये ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयात जबरी चोरी केलेले एकूण 1,64,000/- रुपये
किमंतीचे सोन्याचे दागिने (100% मुद्देमाल ) जप्त करण्यात आलेले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील नमुद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.
सपोनि / श्री. तानाजी पवार
पोहेकॉ / विजय आंबेकर
पोहेकॉ / दिपराज पाटील
पोहेकॉ / योगेश नार्वेकर
पोहेकॉ / विवेक रसाळ
मपोहेकॉ / वैदेही कदम
पोना / दत्तात्रय कांबळे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page