
ठाणे-दिवा भाजपचे शिष्टमंडळ आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) दिव्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष वेधण्यासाठी २० जुलै रोजी भाजपचे रोहिदास मुंडे यांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवसस्थानासमोर होणाऱ्या आंदोलनाला कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

पहा सविस्तर रोहिदास मुंडे काय म्हणाले…
दिवा शहरातील अनधिकृत बांधकामातून पालिका प्रभाग समिती सहायक आयुक्त प्रितम पाटील हे भ्रष्टाचार करत असून स्लॅब मागे 3 लाख रुपये घेऊन अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला असून वाढत्या अनधिकृत बांधकाम विरोधात २० जुलै रोजी रोहिदास मुंडे या वाढत्या अनधिकृत बांधकामा विरोधात मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थाना समोर लक्षवेधी आंदोलन करणार होते. आता या आंदोलनाला पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था याचे कारण देत परवानगी नाकारली आहे. रोहिदास मुंडे यांना आंदोलन करायचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे किंवा आझाद मैदान, मुंबई येथे पोलिसांची परवानगी घेऊन आंदोलन करावे असे पोलिसांनी मुंडे यांना दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.
अनधिकृत बांधकामे दिव्यात सुरू आहेत, यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. महापालिका प्रशासन यास जबाबदार आहे. मुख्यमंत्री निवासस्थाना समोर आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी या विषयाचे गांभीर्य मा.मुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून देण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ थेट विधानभवन येथे आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
- रोहिदास मुंडे,मंडळ अध्यक्ष, दिवा.
