
नेरळ /सुमित शिरसागर- कर्जत पोलीस . ठाण्याच्या हद्दीमध्ये गेले सात वर्षापासून घरफोडी करुन पसार होणारा सराईत चोरटा हा पुन्हा चोरी करण्यासाठी नेरळ मध्ये येणार असल्याची गोपनिय माहिती ही सुत्रांकडून मिळताच नेरळ पोलीसांनी सापळा रचून या घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या नेरळ पोलीसांनी आवळल्या असुन, सध्या हा चोरटा नेरळ पोलीसांच्या कस्टडी मध्ये असुन, नेरळ व कर्जत पोलीस ठाण्यात एकूण आठ तर राज्यातील इतर पोलीस ठाण्यात यापूर्वी एकूण १६ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील शेलू येथे राहणार अनिल अरूण देडे यांच्या फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजा व मुख्य दरवाज्याची कडी कोयंडा दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी तोडून फ्लॅट मधील लाकडी कपाट उचकवून त्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व पाच हजार रुपये रोख असा एकूण ३८,०००/ – रूपये किमंतीचा ऐवज हा अज्ञात चोरट्यानी घरफोडी चोरी करून नेल्याची घटना घडली असल्याने, या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९७ / २०२४ कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) बी.एन. एस प्रमाणे दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याप्रमाणे या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची उकळ करण्याकामी नेरळ पोलीसांकडून घटना स्थळाचे आजूबाजूस जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावरील ५० ते ६० सी.सी.टीव्ही कॅमेरे फुटेज तपासले, तर दिड महिना आरोपी करीता जाणाऱ्या येणाऱ्या मार्गावर सापळा देखील लावण्यात आला परंतू शोध व माहिती मिळाली नाही. मात्र सदर आरोपी पुन्हा चोरी करण्यासाठी नेरळ मध्ये येणार असल्याची गोपनिय माहिती ही सुत्रांकडून मिळताच नेरळ पोलीसांनी सापळा रचून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या नेरळ पोलीसांनी आवळल्या आहे.

तर चोरट्याचे नांव दामु उर्फ आबा छनू शिंदे वय वर्ष ५० असुन, तो रा. कवठाळवाडी, पो.आंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव असल्याचे समोर आले असुन, त्यांच्या कडील काळ्या रंगाच्या सॅगमध्ये घरफोडी करण्यासाठीचे कटावणी, पोपट पाना व स्क्रू ड्रायव्हर सापडून आले आहे. तर त्याच्या कडून अंदाजे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन , अंदाजे ६५ ग्रॅम वजनाचे कानसाखळ्या,मनी,कानातील रिंगा तसेच अंदाजे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व . अंदाजे २० ग्रॅम वजनाची सोन्याची गंठण असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर नेरळ पोलीस ठाण्यातील पाच व कर्जत पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण आठ चोरीची गुन्हे आरोपीकडून उघडकीस आले आहे. तर बोरीवली पोलीस ठाणे ३, वाशी पोलीस ठाणे जि. धाराशिव ५, कल्याण पोलीस ठाणे १, भुम पोलीस ठाणे जि.धाराशिव १, नेकनुर पोलीस ठाणे जि. बीड ६ असे एकूण १६ चोरी व दारूबंदी विरोधी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सदर सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पुणे प्रकटींग पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोहवा सचिन वाघमारे, पोहवा दत्तात्रय किसवे, पोशि राजेभाऊ केकाण, बेंद्रे, पोशि निरजन दवणे, पोशी विनोद वांगणेकर तसेच गुन्हे अन्वेषण विभाग रायगड उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहा फौजदार राजेश पाटील, सहा फौजदार राजेश पाटील, सहा फौजदार संदिप पाटील, पोहवा यशवंत झेमसे, पोहवा मोरे, पोहवा राकेश म्हात्रे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

