दिल्ली ,जनशक्तीचा दबाव- मेरी माटी मेरा देश अंतर्गत देशभरात जमाविलेले मातीचे कलश दिल्ली येथे एकत्र करून अमृत कलश सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यासाठी देशभरातील युवा मोर्चाचे कार्यकर्ते दिल्ली येथे दाखल झाले होते . त्याच अंतर्गत युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाचे राज्यभरातील पदाधिकारी दिल्ली येथे रवाना झाले होते. भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ ऋषिकेश केळकर यांच्या सूचनेनुसार दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधून ( उत्तर व दक्षिण ) तालुक्यामधून अमृत कलश यात्रेसाठी संगमेश्वर युवा मोर्चा दक्षिण अध्यक्ष प्रथमेश सुनील धामणस्कर , संगमेश्वर उत्तर युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील संजय ( बापू ) सुर्वे, युवा मोर्चा सरचिटणीस किशोर दत्ताराम करंबेळे, उपाध्यक्ष मयूर आत्माराम नटे, दक्षिण उपाध्यक्ष शेखर काशीराम गुरव,युवा मोर्चा उत्तर सदस्य मंदार मोहन रहाटे अशी संगमेश्वर तालुका मधील युवा मोर्चा ची टीम दिल्लीकडे कार्यक्रमा साठी दाखल झाले होते.
जिल्हा भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश जी सावंत,संगमेश्वर उत्तरं तालुका अध्यक्ष विनोदजी म्हस्के, संगमेश्वर दक्षिण तालुका अध्यक्ष रुपेशजी कदम यांनी युवा मोर्चाच्या सर्व टीमला मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे सदरचा कलश आज युवा मोर्चाच्या टीमकडून दिल्लीला सुपूर्द करण्यात आला.
अमृत कलश यात्रा आज दिल्लीत निजामुद्दीन येथे दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने स्वयंसेवकांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्यने दिल्लीस्थित मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेल्या देशव्यापी मेरी माती मेरा देश मोहिमेची सांगता 31 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. देशभरातून गोळा केलेले अमृत कलश दिल्लीतील कर्तव्यपथ इथल्या अमृतवाटिका इथे संकलित करून समारंभपूर्वक स्थापन केले जाणार आहेत. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वनिसंगीताचा समारंभ होणार आहे.