
*कर्जत: सुमित क्षिरसागर –* कर्जत तालुक्यातील कर्जत मुरबाड या रस्त्या वर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही वेळेस खड्डे भरले नाही तर येत्या पंधरा दिवसात शेतकरी कामगार पक्षाचे पांडुरंग बंदे रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल असा इशारा एम एस आर डी सी विभागाला दिले हा मुख्य रस्ता इतर राज्यात जोडणारा रस्ता कर्जत मुरबाड या ५४८ ए या राज्यमार्गाला राष्ट्रीय राज्यमार्गाचा दर्जा प्राप्त झाला असुन, या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे व रुंदी करणाचे काम हे एम एस आर डी सी विभागाच्या अंतर्गत व देखरेखीखाली अनेक वर्षापासुन सुरू आहे. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व एम एस आर डी सी विभागाच्या बेजबाबदार पणामुळे कर्जत – मुरबाड राष्ट्रीय राज्यमार्ग ५४८ ए वरील काही ठिकाणाचे काम हे अध्याप जैसे ते स्थितीत असल्याने त्या ठिकाणील रस्त्याची अक्षरशः दुरआवस्थेची परस्थिती आहे. तर झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी खड्डे पडल्याची स्थिती समोर येत असल्याचे चित्र समोर येत असुन, या राष्ट्रीय राज्यमार्ग ५४८ ए वरील वारे गाव ते कळंब गावाचे दरम्यान कळंब सरकारी दवाखान्याजवळ, पोशिर नदी पुलावर व पोही फाटा येथील त्रिकोण चौक भागात मोठमोठे खड्डे पडल्याने व सदर पडलेले खड्डे भरण्यासाठी संबंधित खाते व ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने
कर्जत – मुरबाड या राष्ट्रीय राज्य मार्गवर रात्रंदिवस मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ होणार असल्याने आपघाता व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, एम एस आर डी सी विभाग व ठेकेदार अपघात होऊन जिवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न मात्र सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर कर्जत – मुरबाड राष्ट्रीय राज्यमार्ग ५४८ ए या मार्गावर या आधी ही अपघाता मध्ये काही वाहनचालकांना आपला जिव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

➡️प्रतिक्रिया –
कर्जत मुरबाड हवे रस्ता पोई फाटे ते कळंब सरकारी दवाखाना पर्यंत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती असल्याने, दुचाकीस्वार यांना रात्रीच्या वेळेस खड्डा न दिसल्यामुळे त्यांच्या वाहनाना मोठा अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, व या कडे संबधित विभागाचे अधिकारीवर्ग व ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने,एखादी दुर्घटना झाल्यावर त्यांचे डोळे उघडतील का?
येत्या पंधरा दिवसात हे रस्ते खड्डे मुक्त केले नाही तर मोठं आंदोलन करण्यात येईल
⏩️ पांडूरंग बंदे शेतकरी कामगार पक्षाचे कळंब विभाग चिटणीस सामाजिक कार्यकर्ते
आमच्या विभागाकडून संबधित ठेकेदाराला रस्त्यावरील पडलेले खड्डे भरण्यासाठी नोटीस बजविण्यात आली आहे. सदर बाब ही आमच्या लक्षात आणून दिल्याने आम्ही ठेकेदाराकडून सदर रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्यासाठीच्या सुचना करून, सदर खड्डे ठेकेदाराकडून लवकरात लवकर भरूण घेऊ.
⏩️ संदीप पाटील, कार्यकारी अभियंता,एम एस आर डी सी
विभाग,