चित्रा वाघ यांनी केलं उर्फी जावेदचं कौतुक.

🛑 मुंबई | जानेवारी ३०, २०२३.
▪️ भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांचा वाद अखेर मिटल्याचं दिसून येतंय. उर्फी जावेद आता पूर्ण कपडे घालत असल्याने चित्रा वाघ यांच्याकडून उर्फीचं कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांच्याकडून उर्फीला तिच्या परिधान केलेल्या कपड्यांवरुन धारेवर धरलं होतं. अखेर त्यांचा वाद आता मिटल्याचं दिसून येत आहे.
▪️ चित्रा वाघ म्हणाल्या, माझा विरोध कुठल्याही महिलेला किंवा तिच्या धर्माला नाही. विरोध त्या महिलेच्या विकृतीला होता. पण आता तिला काही सुचलं म्हणून ती पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे उर्फीमध्ये सुधारणा होत असेल तर तिचं कौतुक पण केलं पाहिजे, असं वाघ यांनी म्हटलंय.
▪️ उर्फीने ठरवलं असेल कारण आता ती चांगली कपड्यांमध्ये दिसत आहे. उर्फीने चांगले कपडे घातल्याचं फोटोज मला अनेकजण पाठवत असल्याचंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय. तसेच “माझं एवढंच म्हणणं आहे की, बाई कपडे घाल आणि मग बाहेर फिर” असंही त्या म्हणाल्या आहेत.
▪️द रम्यान, उर्फी सार्वजनिक ठिकाणी अंतरंगी कपडे परिधान करत होती. त्यामुळे उर्फीला चित्रा वाघ यांनी तिच्या कपड्यांवरुन चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटयुध्दही सुरु झालं होतं.
▪️ चित्रा वाघ काय सांगत आहेत याकडं लक्ष न देता उर्फीकडून आणखी अंतरंगी कपडे परिधान करीत वाघ यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला जात होता. मला कोणतेही कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे, असं तिने चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
▪️ तसेच चित्रा वाघ आणि उर्फीमध्ये शाब्दिक युध्दही सुरु होतं. अखेर आता त्यांच्या या वादावर पडदा पडला असून चित्रा वाघ यांच्याकडून उर्फीचं कौतुक करण्यात आलं आहे.