राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर ओसरणार आहे. कोकणातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर मध्य महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर विदर्भ, मराठवाडा, खांदेश येथील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे पुरस्थिती उद्भवली होती. पुण्यात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणे तुडुंब भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. दरम्यान, आज राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर हा ओसरला आहे.
*कोकण व रायगड काही ठिकाणी जोरदार व अत्यंत अल्प ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता…*
कोकणात आज व रायगडला काही ठिकाणी जोरदार त्यातील जोरदार तर तुरळ ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
*मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता…*
मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज कोल्हापूर व उद्या पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा व तुरळक ठिकाणी वादळी वाढत पाऊस पडण्याची शक्यता शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात सहा ते आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
*काही ठिकाणी पुणे व परिसर मध्ये जोरदार पावसाची शक्यता..*
पुणे व परिसरात ५ ऑगस्ट रोजी आकाश संपूर्ण ढगाळ राहून संततधार, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्याच्या घाट विभागात जोरदार चे अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.