शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु; उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार..

Spread the love

करियर- शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (Shikshak Bharti 2024) माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे; अशी माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.

शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयांचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबींचे (Shikshak Bharti 2024) संगणकीय प्रणालीतून परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल; असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

फसवणूक झाल्यास पोलिसांकडे जा (Shikshak Bharti 2024)
शिक्षक भरतीबाबत उमेदवारांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत पोलिसांकडे किंवा शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे यापूर्वी करण्यात आले आहे. पवित्र पोर्टल (Pavitra Portal) मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पद भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार केली जात आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून 14 फेब्रुवारीपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत. याच उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page