रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील वळके नवी वसाहत येथील श्री. राजेंद्र शिवाजी दळवी यांच्या विहिरीमध्ये भक्षाचा पाठलाग करत असताना बिबट्या पडल्याची घटना आज शनिवारी सकाळी १० वा. उघडकिस आली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला विहिरीबाहेर सुखरूपपणे बाहेर काढले.
वळके नवी वसाहत येथे विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती श्री. सौरभ खाके युवा कार्यकर्ते, पाली यांनी वनविभागाला दिल्यानंतर सकाळी 10.30 वाजताचे दरम्याने रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन वन अधिकारी व कर्मचारी पोहोचले. जागेवरील पहाणी केली आसता सदरचा बिबट्या हा विहिरीमध्ये असलेल्या कपारीत बसलेला दिसून आला. सदर विहीर ही लोकवस्तीत श्री दळवी यांच्या घराच्या जवळ असून ती 12 फूट व्यास चार फुट उंच कटडा 50 फूट खोल पक्की विहीर आहे. सदर विहिरीमध्ये पिंजरा दोरीच्या साहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने सोडण्यात आला. आणि सदर बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
तरीही बिबट्या पिंजऱ्यात न आलेने पिंजरा वर घेऊन पिंजऱ्यामध्ये जिवंत कोंबडी ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा पिंजरा खाली सोडून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर तब्बल 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद केले. व बिबट्यास विहिरी बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी मालगुंड डॉक्टर स्वरूप काळे यांच्याकडून तपासणी करून घेतली सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून वय सुमारे तीन वर्ष आहे सदरचा मादी बिबट्या हा तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर मा. विभागीय वनाधिकारी रत्नागिरी, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी व मानद वन्यजीव रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली सदर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदर रेस्कु वेळी श्री.प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी व वनपाल पाली श्री. न्हानू गावडे वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे जाकादेवी वनरक्षक श्रीमती मिताली कुबल मॅडम तसेच पाली गावचे, पोलीस पाटील श्री. अमेय वेल्हाळ, ग्रामस्थ,रेस्क्यू टीमचे सागर तारी, दिनेश चाळके, समीर तारी, धनंजय चव्हाण, संतोष गराटे, अजित साळवी, सौरभ खाके, सदानंद पवार, जयेश झरेकर, प्रशांत मावळणकर, याच बरोबर पाली पोलीस विभागाचे अधिकारी श्री कांबळे, पत्रकार मित्र किरण पवार, सागर पाखरे हे उपस्थित होते. सदरचे बचाव कार्य हे मा विभागीय वनअधिकारी श्री दीपक खाडे. मा.सहायक वनसंरक्षक श्री वैभव बोराटे, श्री. निलेश बापट मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार वनपाल न्हानू गावडे , प्रभु साबने वनरक्षक मिताली कुबल यांनी रेस्कू कार्यवाही केली अशा प्रकारच्या घटना घडल्या किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर माहिती देणेबाबत आवाहन वनविभागाचे वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले