महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे रिंगणात…

Spread the love

लोकसभेसाठी राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप अजून जाहीर झालं नाही. जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेसनं गुरुवारी रात्री राज्यातील सात उमेदवारांची घोषणा केलीय. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. वाचा कोणाला कुठून मिळाली उमेदवारी…

मुंबई : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections 2024) महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. राज्यातील सात जागांवर उमेदवार घोषित करण्यात आलेत. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं आता पुण्यामध्ये काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपाचे मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे. तर वसंत मोरे हे पुण्यातून अपक्ष उभे राहणार आहेत.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे सात उमेदवार कोणते?…

काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये नंदुरबार, नांदेड, अमरावती, लातूर, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आलेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आलीय. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर लातूरमधून शिवाजीराव कलगे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आलीय. कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलीय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page