
२८ जानेवारी/रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विषयाबाबत अनेकांनी संविधानिक पद्धतीने आंदोलन, उपोषण करण्यात आली होती
श्री. रामचंद्र लक्ष्मण मोहिते यांचे शेतकऱ्यांना होणाऱ्या माकडांच्या त्रासाचा शासनाने बंदोबस्त करण्यासाठी तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेचे राहिलेले ५०,०००/- रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत जमा करावेत म्हणून आमरण उपोषण करण्याचा आले होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत इतर ही काही शेतकरी संघर्षाचा निर्णायक टप्पा शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहीजे यासाठी बसले होते.
कोतवडे येथील ग्रामसेवक निवासस्थान बेकायदेशीररित्या उध्वस्त केल्याबद्दल कोतवडेवासी तीव्र आंदोलन जाहिर निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते.
रत्नागिरी-शहरातील तेलीआळी येथील रिक्षाव्यवसायिक जितेंद्र लांजेकर हे गटाराचे पाणी विहिरीत येत असल्याने दुषित पाणी पिण्याची वेळ आल्याने प्रजासत्ताक दिनी आपला अपंग मुलगा आणि आईसह जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषणाला बसले होते. वारंवार तक्रार आणि निवेदने देऊनही संबंधित विभागाने या समस्येकडे गटाराकडे दुर्लक्ष केला आहे. अखेर नाईलाजास्तव आपणाला हे उपोषणा करावे लागत असल्याचे सांगत या रिक्षा व्यावसायिकांने उपोषण केले होते.
वरील सर्व विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांचे त्यांच्या मागण्याचा मान ठेवत यातून मार्ग काढण्यात आला व यांचे आंदोलन, उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळ माने, सतीश शेवडे, अण्णा करमरकर, दादा ढेकणे, संकेत कदम आदी उपस्थित होते.