संगमेश्वर (देवरुख) – आज भाजपा संगमेश्वर कार्यालय देवरुख येथे देवरुख मधील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टर श्री. विशाल आंबेकर यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रवेश झाला.
सदर प्रवेशासाठी पदवीधर प्रकोष्टचे जिल्हा अध्यक्ष श्री. निलेश भुरावणे यांनी प्रयत्न केले होते. मागील अनेक दिवसापासून प्रत्येक दिवशी समाजातील तळागाळातील व्यक्ती ते मोठे उद्योजक,शिक्षक ,वैद्यकीय तसेच कायदा क्षेत्रातील प्रतिष्टीत व्यक्तीनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करीत असल्याचे दिसून येत आहे.
देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या मागील ९ वर्षाच्या सेवा सुशासन सरकारचे काम पाहून मी पक्षप्रवेश केला असल्याचे श्री. आंबेकर मत व्यक्त केले.
या पक्षप्रवेशावेळी भाजपाचे जिल्हा तसेच सर्व तालुका पदाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.