
दिवा: दिवा गणेश नगर दिवा-अगासान रोड, येथील सर्वे क्रमांक २३२/१ मौंजे दातीवली गायरान जागेवर सन २००३ पासून राहत असलेल्या नागरिकांना कायम स्वरुपी हक्क देण्याचे महाराष्ट्र शासनाने सूचना जाहीर केल्या पासून दिवा शहरातील गायरान जागेवर अनेक वर्षा पासून राहत असलेल्या नागरिकांना इमारत बांधण्याचे कारण सांगून नाहक त्रास दिला जात असल्याचे दिवा गणेश नगर येथील काही रहिवाश्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

एकीकडे क्लस्टर योजना लागू झाली असल्याची बतावणी करण्यात आली असुन. दुसरीकडे दिव्यात सदनिकेवर क्लस्टर सर्वे नंबर टाकले असताना, त्या परिसरात अनधिकृत इमारत बांधकाम करण्याचा डाव तर नाही ना!!. पालिकेकडून क्लस्टर सर्वेक्षण झाल्यानंतर अनधिकृत बांधकामे चालू कशी ? याचा अर्थ सरळ सरळ असा होत आहे की,क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत केलेला सर्वे खोटा आहे असे दिसून येते आहे.

दिवा शहरातील गणेश नगर, दिवा आगासन रोड, येथील सदनिकेवर क्लस्टर क्रमांक टाकूनही ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी, यांच्या संगन मताने सुरू असलेले अनधिकृत इमारतीचे काम कधी बंद तर कधी चालु असते असे ?.
असा प्रश्न रहिवाश्यांच्या मनात निर्माण होत आहे,
राज्य सरकारने शासकीय अधिनियमानुसार गायरान जागेवर वर्षांनुवर्षे राहत असलेल्या नागरिकांना अधिकार तत्वे देण्याचे जाहीर केले असताना, बांधकाम व्यवसायिक शासकीय व राजकीय दडपण आणून रहिवाश्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता इमारत बांधकाम करीत आहेत, सध्या राहत असलेल्या रहिवाश्यांना न्याय मिळवून द्यावा.अशी विनंती समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी मुख्यमंत्री साहेब,आयुक्त साहेब ठाणे महानगर पालिका तसेच जिल्हाधिकारी साहेब ठाणे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
जाहिरात

जाहिरात



