बारा किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जासाठी शिष्टमंडळ पॅरिसला…

Spread the love

सिंधुदुर्ग नगरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे.महाराष्ट्र शासनाने ’मराठा लष्करी भूप्रदेश’ ( Maratha Military Landscape of India ) या संकल्पनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे.महाराष्ट्र शासनाने ’मराठा लष्करी भूप्रदेश’ ( Maratha Military Landscape of India ) या संकल्पनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी
प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्व आणि जतन सुनिश्चित होईल, अशी आशा शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page