संगमेश्वरातील शतक पार केलेला प. ना. भिंगार्डे बाजार!

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०३, २०२३. संगमेश्वर | सुरेश सप्रे.

संगमेश्वर येथील बाजारपेठेची ख्याती तालुक्यातच नव्हे तर, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आहे. यामध्ये मे. प. ना. भिंगार्डे या व्यापारी पेढीचं नांव आघाडीवर आहे. दिवसेंदिवस व्यापाराच्या पद्धतीत झालेले बदल लक्षात घेऊन प. ना. भिंगार्डे पेढीने नवी धोरणं अवलंबली. मागील ४ वर्षांपासून ते तालुकावासियांना प. ना. बाजार नावाने आपली सेवा देत आहेत. भिंगार्डे बंधूंचे हे दालन ग्राहकांच्या पसंतीचे केंद्र बनले आहे.

संगमेश्वरात प. ना. भिंगार्डे या व्यापारी पेढीचं नाव आजही आघाडीवर आहे. स्वर्गीय प. ना. भिंगार्डे यांनी १९२० साली सुरू केलेल्या भिंगार्डे पेढीने व्यापाराची नित्यनूतन धोरणे काळानुसार अवलंबली. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु करण्यात आलेल्या या व्यासायला जवळपास १०० हून अधिक वर्षांचा इतिहास लाभलाय. भिंगार्डे यांची चौथी पिढी या व्यवसात आधुनिकतेची कास धरत घट्टपणे पाय रोवून उभी आहे. मागील एका शतकाचा विचार करता, त्याकाळातील परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती असेच म्हणावे लागेल. मात्र, सर्व परिस्थितीवर मात करून व्यापाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नारायणशेठ यांनी सुरू केलेल्या व्यवसायात दुकानात येणाऱ्या ग्राहकाला केवळ उपलब्ध असणारा मालच दिला असे नव्हे तर, ग्राहकाजवळ आपुलकीने संवाद साधत आदरयुक्त प्रेमाचा निर्मळ प्रवाह ग्रामीण भागातील घराघरांत पोचवला. संगमेश्वर हे पूर्वीचे प्रसिद्ध बंदर होते. आता आधुनिक काळात ग्राहक आणि व्यापारी यांच्यामध्ये नाते वृद्धिंगतकरण्याचे काम भिगांर्डे घराण्याने नेहमीच केले आहे.

चौथ्या पिढीतील त्यांची मुले गुरुप्रसाद ऊर्फ दादू, अतुल उर्फ भैय्या, योगेश ऊर्फ राजा यांच्याकडे असणाऱ्या कल्पकतेचा उपयोग करीत व्यवसायात नवनवीन प्रयोग करणे सुरू केले. याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मालाच्या पॅकिंगच्या विशिष्ट पद्धतीमुळे तत्पर सेवा देता येते, या अनुभवानंतर भिंगार्डे यांच्या चौथ्या पिढीने पं. ना. भिंगार्डे या ग्राहकाभिमुख लोकप्रिय पेढीचे पं. ना. बाजारमध्ये रूपांतर केले.

संगमेश्वर हे तसं ऐतिहासिक महत्व असलेले गाव. शास्त्रीआणि सोनवी नदीच्या संगमावरील या गावाने अनेक थोर व्यक्तीमत्व निर्माण केली आहेत, पाहीली आहेत. अशा व्यक्तीमत्वांनी संगमेश्वरचे नाव आता अगदी सातासमुद्रापार पोहोचवले आहे. असंच कुटुंब प. ना. भिंगार्डे पेढीचा व्यापार करत आता शतक महोत्सव पूर्ण करून धीरोदात्तपणे आपली वाटचाल करत आहे. “आम्हाला आजवर मिळालेली ग्राहकांची साथ व आमच्या जुन्यानव्या कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन व सहकार्य याच्याच जोरावर आम्ही आता प. ना बाजार या सुपर आणि अत्याधुनिक मार्केटची सुरवात केली, या सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना गृहोपयोगी सर्व प्रकारच्या वस्तू योग्य दरात देताना आम्हाला मनस्वी आनंद होतो. ग्रामीण भागातील ग्राहक आमचे खरे दैवत. या ग्राहकांना आधुनिक मार्केटची सवय व्हावी यासाठी आम्ही ही सुविधा उपलब्ध केली आहे. येथे येणारा ग्राहक खरेदी करून समाधानाने परतेल याची खबरदारी आम्ही घेत असतो.” अशाप्रकारे भिंगार्डे यांची चौथी पिढी ही ग्राहकांशी असणारे नाते जपत आहे; दृढ करत आहे.

व्यापारात नवनवे प्रयोग सुरू केले. स्वच्छ माल, वजन आणि वाजवी दर या त्रिसुत्रीने प.ना. बाजार घराघरांत आणि मोठमोठ्या हॉटेल आणि तत्सम व्यावसायिकांत सर्वाधिक लोकप्रिय झाला आहे. ग्रामीण जीवनाशी भिंगार्डे बंधू सर्वार्थाने एकरूप आणि समरस झाले असून त्यांच्या नावापुढे ‘शेठ’ पद आले तरी भिंगार्डे परिवार सतत जमिनीवर राहिला आहे. त्यांचा स्वभाव सर्वांना सामावून घेणारा आहे. तसेच शहराच्या धर्तीवर वस्तू देण्याची सध्याची गरज लक्षात घेत प. ना. बाजार केवळ संगमेश्वरवासींयासह संपूर्ण तालुकावासियांची खरी गरज बनला आहे.

चिपळूण तालुक्यातही या कंपनीने महालक्ष्मी एजन्सी आणि में. पी.एन.बी. नावाने दोन दालने सुरु करून एजन्सीचा विस्तार वाढवला आहे. व्यापाराबरोबर समाजकारणाची आवड असल्याने या सर्वांचा एक पाय दुकानात तर दुसरा समाजकार्यासाठी असतो. विविध सामाजिक कार्यात हातभार लागतो. अशा या शताब्दी पार केलेल्या व प. ना. बाजारापर्यंत भरारी घेतलेल्या भिंगार्डे परिवाराला पुढील वाटचालीस असंख्य ग्राहकांच्या वतीने उदंड शुभेच्छा!

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page