
चिपळूण | प्रतिनिधी: ऐन पावसाळ्यात गणेशोत्सवाच्या काळात कोसळलेल्या पिंपळी येथील पुलामुळे गेले पाच-सहा महिने दसपटी विभाग, गाणे-खडपोली एमआयडीसी व चिपळूण परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पुलाच्या कोसळण्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालक, व्यापारी तसेच एमआयडीसीतील कारखानदारांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडला होता.
या महत्त्वाच्या पुलाची पुनर्बांधणी लवकर व्हावी यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार श्री. सदानंद नारायण चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत या कामासाठी तातडीने निधी मंजूर करण्यात आला. काही प्रशासकीय कारणांमुळे कामास विलंब झाला असला, तरी पावसाळ्यापूर्वी हा पूल पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यात येईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता पिंपळी येथील नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. सदानंद चव्हाण यांनी केले आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*