RCB च्या पोरींनी करून दाखवलं, दिल्लीला नमवत पहिल्यांदाच जेतेपदावर कोरले नाव..

Spread the love

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्सला नमवत महिला प्रीमियर लीग २०२४ च्या जेतेपदावर कब्जा केला आहे. दिल्ली संघाचा अंतिम फेरीत ८ धावांनी पराभव करत शानदार विजय नोंदवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा महिला प्रीमियर लीग फायनल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ८ गडी राखून विजय

रिचा घोषचा जबरदस्त चौकार आणि अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये अष्टपैलू खेळी करत आरसीबीच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमधील एकूण १७ वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. मॉलिन्यू, श्रेयंका आणि आशा शोभनाच्या भेजक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघाने पहिल्याच डावात सामना आपल्या बाजूने वळवून घेतला. या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी बाजू या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरली. त्यांनी आरसीबी संघाला विजयासाठी ११४ धावांचे लक्ष्य दिले होते. मेग लॅनिंग आणि शफालीने संघाला एक शानदार सुरूवात करून दिली. पॉवरप्लेपर्यंत या दोन्ही सलामीवीरांनी ६१ धावांचा डोंगर उभारला. त्यांची विस्फोटक फलंदाजी पाहता धावसंख्या मोठा टप्पा गाठेल असे वाटले होते. पण संघाला पूर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. सोफी मॉलिन्यूचे दिल्लीच्या डावातील आठवे षटक सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा एकदा एलिस पेरी आणि रिचा घोष या दोन अफलातून फलंदाजांनी सामन्याच्या अखेरपर्यंत मैदानात कायम राहत संघाला विजय मिळवून दिला.

११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डिव्हाईन आणि मानधनाने संघाला चांगली सुरूवात करून दिली. लक्ष्य साधारण असल्याने दोघीही शांत फलंदाजी करत होत्या पण डिव्हाईन मात्र तिच्या नावाप्रमाणेच एकापेक्षा एक डिव्हाईन शॉट्स मारत होती. शिखा पांडेने डिव्हाईनला बाद करण्यापूर्वी तिने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. तर पेरी आणि मानधना संघाचा डाव पुढे नेत असतानाच स्मृती मिन्नू मिनीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने ३१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या.

तत्त्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू झाल्यानंतरही हा निर्णय संघासाठी खूपच फायदेशीर ठरला. कारण संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ६१ धावा केल्या. शफाली वर्मा तडाखेबंद फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली, तिने २७ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकार मारत ४४ धावा केल्या तर तिला मेग लॅनिंगने साथ दिली. पॉवरप्लेपर्यंत सामना पूर्णपणे दिल्लीच्या हातात होता पण आठवे षटक दिल्लीसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले. त्यानंतर संघ २० षटके पूर्ण होण्यापूर्वीच ऑल आऊट झाला.

दिल्लीच्या डावातील आठव्या षटकात शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि अॅलिस कॅप्सी यांना आरसीबीच्या सोफी मॉलिन्यूने ३ विकेटस घेत दिल्लीचे कंबरडे मोडले. यानंतर संघाचा डाव सावरू पाहणाऱ्या लॅनिंगला (२३( उत्कृष्ट गोलंदाज श्रेयंका पाटीलने पायचीत केले, लॅनिंगने रिव्ह्यू घेतला पण तिला बाद घोषित करण्यात आले. यानंतर १४व्या षटकात आशा शोभनाने मारिजन कापला (१६) डिव्हाईनकरवी झेलबाद केले, तर तिसऱ्या चेंडूवर जोनासनला (३) मानधनाकरवी झेलबाद केले. यानंतर मिन्नू मनीला (५)श्रेयंकाने पायचीत करत सातवी विकेट घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page