राजापूर : राजापूर तालुक्यातील कुवेशी येथून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी बागेत सापडला.विषारी द्रव्य पिवून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कुवेशी गांवकरवाड़ी येथील ऋतिक संजय गावकर हा 16 जून पासून घरातून काही न सांगता निघून गेला होता. त्याच्या अचानक गायब होण्यामुळे कुटुंबिय आणि कुवेशीवासीय हबकून गेले होते .गायब झालेल्या संध्याकाळपासून त्याचा गावातील तब्बल 50/60 तरुण परिसरातील सर्व गावे पालथे घालून शोध घेत होते.सागरी पोलीस ठाणे नाटे येथेही तात्काळ खबर देण्यात आली होती .नाटे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉ. चव्हाण आणि सहकारी कसून शोध घेत होते.काल सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याच कुवेशी येथील बागेमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी एक संशयास्पद द्रव्य असलेली बाटली मिळाल्याने ते पिऊन त्यांने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.