नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जाबद्दल शांसकता, सुशोभीकरण करण्याला कारोडोचा खर्च..
रत्नागिरी : विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. येत्या काही दिवसात राज्य सरकारच्या निधीमधून होत असलेल्या सुशोभीकरणाचा उद्घाटन सोहळा होणार होता.
रविवारी सायंकाळी उशिराने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजंच्या जोरदार कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे बेसावध असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरणाचे काम राज्य शासनाच्या निधीमधून सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून हे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्याआधी रेल्वे स्थानकावरील या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळाहोण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे रत्नागिरी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुशोभीकरण कामांतर्गत बसवण्यात आलेल्या पीओपीच्या शीट्स उडाल्या असून काही शीट्स फाटून नुकसान झाले आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून येत्या काही दिवसा मध्ये उद्घाटन होणार आहे.मात्र त्याआधीच परतीच्या पावसाने रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाला दणका दिला आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे छताला लावलेल्या पीओपीच्या शीट फाटल्या आहेत. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.मात्र आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गेले काही दिवस वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. एकीकडे मान्सून आपल्या परती च्या प्रवासाला सज्ज झाला असून दुसरीकडे मात्र उष्माने म्हणजेच ऑक्टोबर हीटने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज अचानक सायंकाळी परतीच्या पावसाने दाणादाण उडवली. विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेकांची भांबेरी उडवली.या पावसाचा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वेस्थानकावर छताला केलेले पीओपी खाली कोसळले.त्याच्या वरचा पडदा लोंबकळलेल्या अस्वथेत होता.
या ठिकाणी प्रवासी उभे नसल्या ने कोणाला ही काहीही झालेले नाही.मात्र अवघी २० मिनिटे विजेच्या कडकडाट आणि विजेच्या गडगडाटासह पडलेल्या परतीच्या पावसामुळे आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे
उद्घाटनाच्या आधीच सुशोभीकरण कामाची अशी स्थिती झाल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे प्रवाशांनी कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली. वादळ सुरू असताना नव्याने बसवण्यात आलेल्या पीओपीच्या शीट्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उडतानाचचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.