दीपक भोसले/संगमेश्वर- खाडी समांतर परचुरी फुणगूस रस्त्याची दुरवस्था झाली आहे .पहिल्याच पावसात रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत परचुरी फुणगूस रस्त्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच खोदकाम पुर्ण झाले असताना देखील रस्त्याचे खडीकरणाचे काम न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल आला आहे. ऐन पावसाळ्यात एखादा माणूस आजारी झाला तर दवाखान्यात नेणे कठीण झाले आहे ..
प्रशासनाने लक्ष घालून ठेकेदाराकडून वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.