न्युझीलँड- पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत असं आजपर्यंत आपण शाळेत शिकत आलोय संपूर्ण जगाला देखील हेच माहित आहे. मात्र, 375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड समुद्रात सापडला आहे. वैज्ञानिकांनी अथक परिश्रमानंतर हा आठवा खंड शोधून काढला आहे. वैज्ञानिकांचे हे आजपर्यंतचे सर्वात मोठं संशोधन मानले जात आहे. हे पृथ्वीवर सर्वात लहान महाद्विप मानले जात आहे.
न्यूझीलंड हा नव्याने सापडलेल्या आठव्या खंडाचाच एक भाग
झीलँडिया असे या नव्या महाद्विपाचे नाव आहे. या महाद्विपाचा 94 टक्के भाग हा समुद्रात बुडाला होता. न्यूझीलंड हा झीलँडियाचाच एक भाग आहे. 375 वर्षांपूर्वी हा खंड अस्तित्वात होता. समुद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी झीलँडिया हे आठवे महाद्विप शोधून काढल्याची माहिती जाहीर केली. Phys.org ने याबाबतचे वृत्त दिले आहे. झीलँडिया हे महाव्दिप सुमारे 50 लाख स्क्वेअर किमी परिसरात पसरले होते. मादागास्करपेक्षा ते 6 पट मोठे होते. हा जगातील सर्वात लहान आणि पातळ खंड मानता जात आहे. न्यूझीलंडच्या क्राऊन रिसर्च इन्स्टिट्यूटचे भूवैज्ञानिक अँडी टुलोच हे या खंडाचा शोध घेणाऱ्या संघाचा एक भाग होते.
55 कोटी वर्षांपासून झीलँडियाचे अस्तित्व असल्याचे पुरावे
55 कोटी वर्षांपासून झीलँडियाचे अस्तित्व असल्याचे पुरावे असल्याची माहिती भूवैज्ञानिक अँडी टुलोच यांनी दिली आहे. झीलँडिया गोंडवानाचाच एक भाग होता असा दावा देखील संशोधक करत आहेत. या खंडाचा जवळपास 94% भाग पाण्याने व्यापलेला आहे. सध्या पृथ्वीवर न्यूझीलंडसारखी मोजकीच बेटे अस्तित्वात आहेत.झीलँडिया पूर्वी गोंडवानाच्या महाखंडाचा भाग होता. सुमारे 550 दशलक्ष वर्षांपूर्वी याची निर्मीती झाली होती. दक्षिण गोलार्धातील संपूर्ण क्षेत्र याचाच भाग होता. मात्र, कालांतराने गोंडवाना अनेक भागांमध्ये विभक्त होऊन इतर खंडांची निर्मिती झाली.
असा गायब झाला होता हा आठवा खंड समुद्रात
नव्याने सापडलेला झीलँडिया हा आठवा खंड 105 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवानापासून विभक्त होण्यास सुरुवात झाली होती. या खंडाचा एक भाग तुटून समुद्रात विलीन झाला होता. शास्त्रज्ञांनी 2017 मध्ये पहिल्यांदा झीलँडिया खंडाचा शोध लावल्याचा दावा केला होता. 1995 पासून शास्त्रज्ञ याचा शोध असल्याचा दावा केला जात आहे.
असा शोधला हा 8 वा खंड
1642 मध्ये पहिल्यांदा झीलँडिया खंडाचे अस्तित्व उघड झाले. डच व्यापारी आणि खलाशी हाबेल तस्मान ग्रेट सदर्न हा खंडाची शोध मोहिम सुरु केली. न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर ते पोहचले. स्थानिकांनी आजूबाजूच्या परिसराची माहिती दिली. याचवेळी झीलँडियाबद्दलही माहिती समोर आली. मात्र, हा खंड शोधण्यासाठी अनेक वर्षे लागली. उंची, विशेष भूवैज्ञानिक रचना, स्थिर क्षेत्र, महासागराच्या नियमित मजल्यापेक्षा (पृष्ठभाग) जाड कवच यांच्या मदतीने हा खंड शोधून काढला. झीलँडियामधील खंडांमध्ये या सर्व बाबींमध्ये साधर्म्य आढळून आले. खडकांच्या नमुन्यांच्या अभ्यासात पश्चिम अंटार्क्टिकामधील एक नमुना न्यूझीलंडच्या पश्चिम किनार्याजवळील कॅम्पबेल पठाराजवळ सबडक्शन झोन दर्शवत असल्याचे संशोधनात उघड झाले आहे. संशोधकांना त्या भागात चुंबकीय विसंगती आढळल्या नाहीत.